आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोलगीत एकवटणार ३ राज्यातील आदिवासी:विश्व आदिवासी दिन बैठकीत  विविध समित्या गठीत ; पारंपरिक वेशभूषेत घडणार संस्कृतीचे दर्शन

नंदूरबार15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी विश्व आदिवासी गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर मोलगीत बैठक पार पडली. या बैठकीत यंदाचा सातपुड्यातील आदिवासी दिनाचा कार्यक्रम अक्कलकुवा तालुक्यातील मोलगीत घेण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. या कार्यक्रमात तीन राज्यातील आदिवासी बांधव उपस्थित राहणार असून ते पारंपरिक वेशभूषा परिधान करूनच आदिवासी संस्कृतीचे प्रदर्शन करतील. यावेळी विविध समित्याही गठीत करण्यात आल्या.

९ ऑगस्ट २०२२ आदिवासी गौरव दिवस साजरा करण्यासंबंधी मोलगीत सातपुडा परिसरातील कार्यकर्त्यांची बैठक झाली. सर्वानुमते विविध निर्णयांवर चर्चा होऊन कार्यक्रमाची रूपरेषाही ठरवण्यात आली. कार्यक्रमात ढोल-ताशांच्या गजरात रॅलीची सुरुवात हाेईल. अनु.आश्रम शाळा ते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयापर्यंत रॅली निघेल. माेलगीत कार्यक्रम स्थळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात निश्चित केले असून कार्यक्रमास व्यापक स्वरूप देण्यासाठी विविध समित्याही गठित केल्या.

बैठकीला सर्वपक्षीयांचा सहभाग होता. त्यात काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जि.प. गटनेते सी.के. पाडवी, सरपंच मनोज तडवी, सामाजिक कार्यकर्ते डॉ.दिलवरसिंग वसावे, माजी जि.प. सदस्य सीताराम राऊत, माजी सभापती पिरेसिंग पाडवी, ॲड.अभिजित वसावे, करमसिंग पाडवी, रामजी पाडवी, पांडू सेठ, दिनकर पाडवी, ॲड.गजमल वसावे, सुमित्रा वसावे, शीतल वसावे, माजी सभापती रुषा वळवी, पं.स. सदस्य अशोक राऊत, जयसिंग वळवी, धीरसिंग वळवी, रामसिंग वळवी, ॲड. सरदार वसावे, वाण्या वळवी, वसंत वळवी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.पर्यावरण व विश्वाच्या भवितव्यावर चिंता : वाढते जागतिकीकरण व वाढत्या धावपळीत विश्वाचे भवितव्य पर्यावरणाच्या सुरक्षेवर आधारित आहे, हे पर्यावरण वाचवण्याची ताकद केवळ आदिवासी संस्कृती व जीवन पद्धतीतच आहे. म्हणूनच विश्व वाचवण्यासाठी या संस्कृतीचे संवर्धन काळाची गरज आहे. देश वाचवण्यासाठी आधी संविधान वाचवणेही आवश्यक असल्याचे मत सभेत मांडण्यात आले.

आदिवासी बोलीभाषा दशकावर चर्चा
सर्व आदिवासी बोलीभाषांचे जतन व्हावे यासाठी युनोने २०२२ ते २०३२ पर्यंत जागतिक आदिवासी बोलीभाषा दशक साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मोलगीत या दशकाचे पहिले वर्ष साजरे हाेईल. तसेच चर्चाही करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...