आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा:प्यारीबाई ओसवाल शाळेत विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा

नंदुरबार15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील वे.खा. भगिनी सेवा मंडळ धुळे संचालित श्रीमती प्यारीबाई ओसवाल विद्यामंदिर शाळेत लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पालक प्रतिनिधी रवींद्र भावसार, ज्येष्ठ शिक्षिका शोभा पाटील तर अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक राहुल मोरे उपस्थित होते. बालमंदिर ते इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी भाषणातून या महामानवांच्या जीवन कार्यास उजाळा दिला. यानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात बालमंदिर व इयत्ता पहिलीसाठी वक्तृत्व स्पर्धा, दुसरीसाठी अनुलेखन स्पर्धा, तिसरीसाठी लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्यावर निबंध स्पर्धा तर इयत्ता चौथी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे विषय देण्यात आले होते.

या विविध स्पर्धांमध्ये इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या ८० विद्यार्थ्यांनी तर बालमंदिर विभागाच्या २५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शिक्षक कुमुद शिंदे, स्मिता माळी, तुषार कुवर, शशिकांत निकम यांनी यावेळी झालेल्या स्पर्धांचे परीक्षण केले.

बातम्या आणखी आहेत...