आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:स्काऊट-गाइडच्या जिल्हा आयुक्तपदी वर्षा जाधव

शहादा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील कर्मासाक्षी प्रेमचंद जाधव शैक्षणिक संकुलाच्या संचालिका व सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळाचा सचिव वर्षा संजय जाधव यांची स्काऊट- गाइडचा जिल्हा मुख्यालय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

वर्षा जाधव यांच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासह सर्वांगीण उन्नतीसाठी सतत उपक्रम राबवण्याची क्रियाशीलता आदी बाबी विचारात घेता महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाइड राज्य कार्यालय मुंबई या संस्थेच्या राज्य मुख्य आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी जाधव यांची नियुक्ती केली आहे.

जिल्हा कार्यालयात लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, जिल्ह्यातील बहुतांश शाळांमध्ये कब बुलबुल, स्काऊट, गाइड, रेंज रोवर रेंज या पथकाचे कार्य तसेच जिल्हा राज्य व राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमांमध्ये प्रत्येक शाळेतील स्काऊट-गाइड सहभागी होण्यासाठी ही समिती कार्यशील राहील. या निवडीबद्दल सोनाबाई शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा आशाताई जाधव, सातपुडा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड. सुधीर जाधव, सचिव प्रा. संजय जाधव, विश्वस्त इस्माईल मन्सुरी, समन्वयक संजय राजपूत आदींनी स्वागत केले आहे.

बातम्या आणखी आहेत...