आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचितवी जिल्हा परिषद गटाच्या पोट निवडणुकीत महाविकास आघाडी पुरस्कृत राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील सुरेश गावित २३१९ मतांनी विजयी झाले. त्यांनी अपक्ष उमेदवार रवींद्र नकट्या गावित यांचा पराभव केला. चितवी गटातील दिवंगत जिल्हा परिषद सदस्य सुरेश गावित याच्या निधनानंतर रिक्त जागेवर शनिवारी मतदान शांततेत पार पडले. तर नवापूर तहसीलदार कार्यालयात सोमवारी मतमोजणीनंतर पोटनिवडणुकीचा निकाल हा दिवंगत जि.प. सदस्य सुरेश गावित यांचे वारसदार सुनील सुरेश गावित यांना मतदारांनी अपेक्षित विजयी कौल दिला. एकूण मतदान १३ हजार ५४५ म्हणजे ७९.६७ टक्के पैकी ४.५ टक्के (६१६) मते नोटाला मिळाले, अपक्ष उमेदवार निकाल रवींद्र नकट्या गावित यांना ५ हजार ३०५ मिळालेली मते तर राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार सुनिल गावित यांना ७ हजार ६२४ मिळवून १ हजार ३१९ मतांनी विजयी झाले. भाजपची साथ नवापूर तालुक्यातील नंदुरबार जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार असला तरी भाजपाने उमेदवारी दिली नव्हती. दिवंगत जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश गावित यांचे कोरोनात निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्या घरातील उमेदवाराला प्राधान्य दिले व भाजपकडून उमेदवारी दिली नाही. त्यांना खासदार हीना गावित यांनी पेढा भरवला. आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनीदेखील स्वागत केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.