आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लघु पाटबंधारे योजना:पावसामुळे रंका नदीकाठावरील गावांना दिला सतर्कतेचा इशारा

नंदुरबार9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लघु पाटबंधारे योजना रंकानाला (ता.नंदुरबार) पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सद्यस्थितीत पाणीपातळी १४३.७५मीटरची नोंद झाली असून प्रकल्प १०० पूर्ण क्षमतेने भरल्याने तसेच हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनुसार पुढील ७२ तासात पाऊस होण्याची शक्यता असल्याने पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रकल्पाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार असल्याने रंका नदीनाल्या काठावरील देवपूर, नटावट, लहान मालपूर, भवानीपाडा, धानोरा नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. नदीकाठावरच्या गावातील नागरिकांनी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी काठाजवळ जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...