आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामस्थांना लाभ‎:दहिदुंलेत मोफत‎ आरोग्य शिबिराचा‎ ग्रामस्थांना लाभ‎

नंदुरबार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार तालुका विधायक समितीचे ‎ शिक्षणशास्त्र महाविद्यालयातर्फे ‎ दहिंदुले येथे आयोजित राष्ट्रीय सेवा ‎ योजनेच्या विशेष श्रम संस्कार ‎ शिबिरामार्फत आयाेजित मोफत ‎ आरोग्य शिबिराचे उद्घाटन पुष्पेंद्र ‎ रघुवंशी यांनी केले. या शिबिराचा ‎ ग्रामस्थांनी माेठ्या संख्येने लाभ ‎ घेतला. ‎ याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य ‎ डॉ.एम. एस. रघुवंशी, दहिंदुलेचे ‎ सरपंच राजेंद्र वळवी व उपसरपंच ‎ गणेश नन्नवरे उपस्थित होते.

‎आरोग्य शिबिरात गावातील लोकांचे ‎ ब्लड शुगर, बीपी व ईसीजी आदी ‎ तपासण्या एच.एम. लॅबरोटरीचे ‎ संचालक कैलास मराठे, त्यांचे ‎ सहकारी मोसमी वसावे, जयश्री ‎ पवार व सोमनाथ करंडे यांनी केल्या. ‎ निम्स हॉस्पिटल नंदुरबार येथील ‎ डॉक्टरांनी दम्याच्या रुग्णांची ‎ तपासणी केली. या आरोग्य शिबिरात ‎ ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग ‎ घेऊन या शिबिराचा लाभ घेतला. ‎ शिबिर महाविद्यालय व रासेयाे यांनी ‎ आयोजित केले होते. शिबिराच्या ‎ यशस्वितेसाठी कार्यक्रम अधिकारी ‎ डॉ.कैलास चौधरी, महिला ‎ कार्यक्रमाधिकारी डॉ.दीपा पाटील व ‎ रासेयाेच्या स्वयंसेवकांनी परिश्रम ‎ घेतले.

बातम्या आणखी आहेत...