आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणी आणणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले. नंदुरबार तालुक्यातील तलवाडे, बलवंड, खर्दे. खु. येथील सभागृह व रस्ता क्राँक्रीटिकरण अशा विविध विकास कामांचे भूमीपूजन कार्यक्रम आज झाला. या वेळी पालकमंत्री डॉ. गावित बोलत होते. खासदार डॉ. हिना गावित, सरपंच (बलवड) सागर पाटील, सरपंच (तलवाडे) ताराबाई राजपूत, सरपंच (खोंडामळी) युवराज देसले, सरपंच (भोणे) पावबा धनगर, सरपंच नितीन पाटील (खर्दे. खु.) माजी जि.प.सदस्य रवी पाटील, सागर तांबोळी उपस्थित होते.
या वेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, आपल्या जिल्ह्यात नद्या व धरणामध्ये पुरेसा पाण्याचा साठा उपलब्ध असून हे पाणी प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत आणण्यासाठी प्रयत्न करणार असून या भागात एकदाची पाण्याची सोय झाल्यावर येथील शेतमालावर प्रक्रिया करण्यासाठी या भागात लहान मोठे कारखाने सुरू करू. यामुळे येथे रोजगाराची संधी उपलब्ध होऊन स्थलातर थांबेल.
ज्या गरीब व्यक्तींना घरे नाही अशांना आदिवासी विकास विभागामार्फत मोठया प्रमाणात घरकुलाचे काम घेण्यात येत असून ज्या व्यक्तींचे ‘ड’ यादीत नाव सर्व आदिवासी बांधवांना १०० टक्के घरे देण्यात येईल. या भागातील विविध विकासकामासाठी पुढील वर्षी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. केंद्र सरकारने नवीन डी. पी, नवी सबस्टेशन सुरू करणे तसेच जुन्या वीजतारा बदलण्यासाठी निधी दिला असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वसाधारण श्रेणीतील नागरिकांनी रोजगार हमी योजनेचे कार्ड व कामगार कार्ड काढून शासकीय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.