आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिला दिवस:शाळेच्या पहिल्या दिवशी ट्रॅक्टर, बैलगाडी अन् कारने जल्लोषात स्वागत, विद्यार्थी, पालक अन् शिक्षकांत प्रचंड उत्साह

नंदुरबार12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या प्रदीर्घ दोन वर्षाच्या काळानंतर प्रथमच शाळा भरल्याने जिल्ह्यातील सर्वच शाळांमध्ये विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये उत्साह दिसून आला. नवागतांचे स्वागत विविध पद्धतीने करण्यात आले. बैलगाडी, कार, ट्रॅक्टरच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यात आले. पहिल्यांदाच शाळेत दाखल झालेल्या मुलांच्या डोळ्यात अश्रू तर दुसरीपासून तर आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू असे संमिश्र चित्र पाहायला मिळाले. आकाशात फुगे सोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पहिल्याच दिवशी पालिकेच्या शाळेत नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले.

रनाळे जि.प.शा‌ळा
रनाळे येथील जिल्हा परिषद कन्याशाळेत विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते पाठ्यपुस्तक वाटप करून नवागतांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी केंद्रप्रमुख आर. व्ही. गवळे, मुख्याध्यापक अमृत पाटील, उज्ज्वला पाटील मंगेश वसावे व अंगणवाडी सेविका उपस्थित होते.

डी. आर. स्कूलमध्ये मुलांच्या स्वागतासाठी ट्रॅक्टरने मिरवणूक
नंदुरबार येथील श्रीमती डी. आर. हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत ट्रॅक्टरवर रॅली काढून तसेच प्रत्येक विद्यार्थ्यास गुलाबपुष्प व खाऊ वाटप करून ढोल ताशांच्या गजरात अतिशय उत्साही वातावरणात नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, नंदुरबार एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन ॲड. परीक्षित मोडक, नगरसेवक दीपक दिघे, मुख्याध्यापक नारायण भदाणे, उपमुख्याध्यापक सुभाष चौधरी, पर्यवेक्षक पंकज पाठक, विपुल दिवाण आदी मान्यवरांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उत्सव समिती प्रमुख राजेंद्र लांडगे, हेमंत खैरनार, दिनेश वाडेकर तसेच सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काल्लेखेतपाडा
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, काल्लेखेतपाडा ता. धडगाव जि. नंदुरबार येथे शाळापूर्व तयारी अभियानांतर्गत दुसरा मेळावा घेण्यात आला. ‘ पंचायत समिती सदस्या शोभीबाई फत्तेसिंग पावरा हे मुख्य अतिथी होते. प्रमुख पाहुणे म्हणून उमराणी गावचे सरपंच आशाताई वंतीलाल पावरा, सामाजिक कार्यकर्ते वंतीलाल पावरा, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पंडित पावरा हे उपस्थित होते. गावातील युवक मित्र पवन पावरा, रोहित पावरा, हरेश पावरा, ज्योती साळवे, जागृती पावरा, सचिन पावरा, मनीषा पावरा, उज्ज्वला पावरा यांनी स्वयंसेवक म्हणून काम पाहिले. यावेळी तानाजी पावरा, पाल्या पावरा, तेरसिंग पावरा, गणेश पावरा, नटवर पावरा, कुशाल पावरा, बटेसिंग पावरा, मोगा साळवे, चेतन पावरा, जगदीश पावरा, संतोष पावरा, बायसीबाई पावरा, कोटा पावरा, प्रशांत पावरा, जत्र्या पावरा, जयवंत पावरा, रुमाल्या पावरा आदी उपस्थित होत्या.

बातम्या आणखी आहेत...