आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वन विभाग:कोठलीत छापा; २ लाखांचा लाकूड साठा, फर्निचर वन विभागाकडून जप्त

नवापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार तालुक्यातील तलाव पाडामधील कोठली येथे अवैधरीत्या दडवलेला लाकूड साठा व फर्निचर असल्याची माहिती वन विभागाला मिळाल्याने शिवकुमार जंगली बीजकर्मा, रा. कोठली यांच्या घरात जाऊन छापा टाकला. त्यावेळी घराच्या बाजूला असलेल्या शेडमध्ये अवैधरीत्या दरवाजे फलके १८, दरवाजा चौकट २, साग चौपट नग ६१ असा एकूण २ लाख रुपयांचा लाकूड साठा जप्त करण्यात ऑला. ताे शासकीय वाहनात भरून येथील शासकीय विक्री आगारात जमा करण्यात ऑला. या कारवाईत सहाय्यक वनसंरक्षक धनंजय ग.पवार (प्रादेशिक व वन्यजीव) नंदुरबार, वनक्षेत्रपाल वर्षा चव्हाण नंदुरबार प्रादेशिक, वनक्षेत्रपाल स्नेहल अवसरमल, नवापूर, वनक्षेत्रपाल प्रा.शिवाजी रत्नपारखे चिंचपाडा, वनपाल भूपेश तांबोळी, शीतल तोरवणे, सोनखांब, भिवाजी दराडे, खेकडा, सुनीता पाटील, वडकळंबी, ए.एम. शेख, बोरझर, वनरक्षक भानुदास वाघ, बिलाल शहा, कृष्णा वसावे, प्रतिभा पवार, प्रतिभा बोरसे, पूनम सोनवणे, कल्पेश अहिरे, कमलेश वसावे, विकास शिंदे, लक्ष्मण पवार, अनिल वळवी, अमोल गावीत, गिरीश वळवी, पिंकी बडगुजर, मनीषा जाधव ऑदी सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...