आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कापूस हंगाम:पांढऱ्या सोन्याला चकाकी; 1000 ते 1200 रुपयांची महिन्याभरातच वाढ

नंदुरबार12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील राजीव गांधी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या महिन्याभरात कापसाची आवक वाढली असून, आज अखेर १२००० क्विंटल खरेदी केला आहे. महिन्याभरात कापसाचे दर जवळपास एक हजार रुपयांनी वाढले आहेत. यापुढे मात्र कापसाचे दर वाढण्याची शक्यता कमी असून यापुढे कापसाचे दर स्थिर राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नंदुरबार जिल्ह्यामध्ये कापसाला यंदा चांगला भाव मिळत आहे. चायना, बांगलादेश, भारत व त्या खालोखाल अमेरिकेत कापसाचे उत्पादन घेतले जाते. चायना व बांगलादेश मध्ये कापसाचे उत्पादन घटल्यास भारताच्या कापसाला चांगली मागणी असते. महाराष्ट्रामध्ये विदर्भासह धुळे जिल्हा, जळगाव जिल्ह्यात कापसाचे उत्पादन घेतले जाते. त्या खालोखाल नंदुरबार जिल्ह्यात कापूस उत्पादन घेतले जाते.

नंदुरबार जिल्ह्यातील कापसाला यंदा ९२०० ते ९ हजार ५०० रुपये क्विंटल दर मिळत आहे. हंगामाच्या सुरुवातीला आठ हजार दोनशे एवढा भाव होता.महिन्याभरात मात्र हा दर १००० ते १२०० पर्यंत वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होणार आहे.

नंदुरबारच्या कापसाच्या गठाणला मागणी
खान्देशात सर्वोत्तम कापसाचे उत्पादन नंदुरबार जिल्ह्यात घेतले जाते. कापसाचे दर आणि कापसाची गुणवत्ता धाग्यावर अवलंबून असते. यंदा कापसाला सहा हजार दोनशे रुपये क्विंटल असा हमीभाव जाहीर झाला आहे. तीन हजार रुपये जास्त भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान पसरले आहे. नंदुरबार जिल्हा हा गुजरात सीमेवर असून कापसाचे उत्पादन दर्जेदार असल्याने नंदुरबारच्या कापसाच्या गठाणला बाजारपेठेत चांगली मागणी आहे.

बाजार समितीमध्ये कापूस विक्रीला प्राधान्य
राजीव गांधी कृषी उत्पन्न बाजार समितीत रोज कापस विक्रीस येत असून बाराशे क्विंटल कापसाची आवक होत आहे. नंदुरबारसह शेजारील गुजरात राज्याच्या सीमेवर खासगी व्यापाऱ्यांकडून कापूस खरेदी केला जातो. तर काही व्यापारी शेतात येऊन खरेदी करतात. खेडा खरेदी विक्रीत अनेकदा मापात फसवणूक होत असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापूस विक्री करण्यावर शेतकऱ्यांच्या कल आहे.

बातम्या आणखी आहेत...