आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा नाभिक समाज हितवर्धक व कर्मचारी संस्थेची त्रैमासिक बैठक बुधवारी येथे पार पडली. त्यात विधवा भगिनींना सन्मानाने जगता यावे म्हणून जुनी परंपरा खंडित करण्यासाठी आणि व्हाॅट्सअॅपवरील काेणत्याही कार्यक्रमाचे आमंत्रण ग्राह्य धरावा, असे दोन महत्त्वपूर्ण ठराव या बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आले. तसेच संस्थेत कुणीही समाजबांधव वार्षिक व आजीवन सभासद होऊ शकतो, असा ठरावही मंजूर झाला.
विधवा माता, भगिनी कपाळावर टिकली लावू शकतील. चांगली साडी नेसू शकतील. सर्व कार्यक्रमात सहभागी होऊ शकतील. विधवा माता भगिनी यापुढे आपले जीवन सन्मानाने जगू शकतील. तसेच सध्याच्या धावपळीच्या जीवनात लग्नकार्यात घरची मंडळी घरोघरी जाऊन लग्नपत्रिका वाटप करतात. त्यात वेळ व पैसा वाया जातो. त्यात अपघातासारख्या घटना घडून शुभ कार्यात वाईट बातमी येते. आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअॅप, फेसबुक किंवा फोन करून आपण आपल्या घरच्या कार्याचे आमंत्रण देऊ शकतो. यासाठी संस्थेमार्फत ‘व्हॉट्सअप’वरील आमंत्रण ग्राह्य धरण्याचा ठरावही सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
या बैठकीला नंदुरबार जिल्हा नाभिक समाज हितवर्धक व कर्मचारी संस्थेचे पदाधिकारी संस्थाध्यक्ष पंकज भदाणे, सचिव अरविंद निकम, सहसचिव शिवाजी मिस्तरी, कोषाध्यक्ष छगन भदाणे, उपाध्यक्ष हिमांशू बोरसे, उपाध्यक्ष गजेंद्र जाधव, प्रसिद्धी प्रमुख प्रकाश देवरे, संचालक विजय सैंदाणे, विजय सोनवणे, नितीन मंडलिक, सुधीर निकम, अनिल भदाणे, शशिकला सोनवणे, सल्लागार पी.टी. सोनवणे, सल्लागार प्रभाकर चित्ते, शहादा, महिला जिल्हाध्यक्ष जयश्री निकम, आजीवन सभासद मयूर सूर्यवंशी, ओंकार शिरसाट, छगन सूर्यवंशी, अनिता सूर्यवंशी, नरेंद्र महाले, प्रभाकर बोरसे, एकनाथ चित्ते, प्रवीण वरसाळे, गणेश पवार, भालचंद्र जगताप, प्रकाश सैंदाणे, लक्ष्मीकांत निकम, राजेश सूर्यवंशी, मीनाक्षी भदाणे, प्रदीप सोनवणे, प्रभाकर शिरसाट आदी पदाधिकारी उपस्थित हाेते.
गुणपत्रक जमा करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन
यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला जाणार असून, १० जुलै रोजी कार्यक्रम हाेणार आहे. त्यासाठी इयत्ता १० वी, १२ वीच्या परीक्षेत ६० टक्क्यांच्या वर गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांनी गुणपत्रक संचालकांकडे जमा करावे किंवा व्हाॅट्सअॅपवर पाठवावेत. उच्च शिक्षित विद्यार्थ्यांचाही सत्कार होईल. संस्थेत यापुढे कुणीही समाज बांधव वार्षिक व आजीवन सभासद होऊ शकतो, असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.