आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:दारू पिण्यास पत्नीने पैसे दिले‎ नाही; पतीने केला मुलीचा खून‎

नंदुरबार‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पत्नीकडे दारू पिण्यासाठी पैसे‎ मागितले, मात्र तिने पैसे दिले नाही‎ या कारणाने स्वत:च्या चार वर्षीय‎ बालिकेला जमिनीवर आपटून गळा‎ दाबून तिची हत्या केल्याने खळबळ‎ उडाली आहे.‎पती सोमनाथ पाडवी (वय २४)‎ याने पत्नी भारती सोमनाथ पाडवी‎ हिच्याकडे दारूसाठी पैसे मागितले.‎

पैसे दिले नाही याचा त्यास राग‎ येऊन झोपलेल्या चार वर्षीय रुचिता‎ पाडवी या बालिकेला जमिनीवर‎ आपटून व गळा दाबून खून केला.‎ ही घटना लक्कडकोट, ता.शहादा‎ येथे २ जानेवारी रोजी घडली. या‎ प्रकरणी ३ रोजी आरोपीची पत्नी‎ भारती पाडवी हिच्या फिर्यादीवरून‎ गुन्हा दाखल करण्यात आला.‎

बातम्या आणखी आहेत...