आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्रध्दा हत्याकांडातून पालकांसह मुलींनी धडा घेतला पाहिजे, इतके ते अमानवीय कृत्य आहे. जिल्ह्यात अमृत आहार योजनेसाठी निधी नाही. सिव्हील हॉस्पिटलमध्ये औषधांचा तुटवडा असेल तर ही बाब गंभीर आहे. जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून यातून औषधांचा पुरवठा तात्काळ कसा देता येईल, यावर चर्चा करीन. असे भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सांगितले.
भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या विजयपर्व निवासस्थानी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, किन्नरी सोनार, डॉ. सपना अग्रवाल, नीलेश माळी आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी चित्रा वाघ म्हणाल्या, यापूर्वी मी धडगाव येथील मयत विवाहितेच्या परिवाराला न्याय देण्यासाठी आले होते. आता भाजपच्या संघटनात्मक आढावा घेण्यासाठी आले आहे. शिंदे व फडणवीस सरकारमध्ये महाराष्ट्र हा भयमुक्त व भितीमुक्त झालेला दिसेल. असे काम महाराष्ट्रात सद्या सुरू आहे.
अमृत आहार योजनेसाठी निधी मिळाला नसेल तर त्याची चौकशी करते. प्रत्येक बुथवर २५ महिला राहतील. लोकसभेत ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचा मानस आहे. विधानसभेत २०० प्लस जागा निवडून येतील, असा विश्वास आहे. महिलांचा सहभाग अधिक असेल. पोलिस अधिक्षक, जिल्हा प्रशासनाच्या अधिका-यांशी भेट घेऊन योजना गावागावापर्यंत पोहोचवणार आहेत, असेही चित्रा वाघ यानी सांगितले.
फडणवीस मांडताय भूमिका
छत्रपती शिवाजी महाराजांवर काहींनी आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भुमिका मांडली आहे. प्रसाद लाड यांनी दिलगीरी व्यक्त केली आहे. बावनकुळे, फडणवीस हे रोज प्रतिक्रीया व्यक्त करीत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.