आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायतींच्या निवडणुका:सरपंचपदासाठी 89 जणांची माघार

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी माघारीच्या दिवशी ८९ जणांनी सरपंचपदासाठी दाखल केलेले अर्ज माघारी घेतले. तसेच सदस्यपदासाठी दाखल २७३ अर्ज माघारी घेण्यात आले.

सरपंचपदासाठी ३१२ अर्ज दाखल झाले होते. पैकी ८९ जणांनी अर्ज मागे घेतल्याने २२३ उमेदवार उभे आहेत. तसेच १ हजार ४४३ जणांनी अर्ज भरले होते त्या पैकी २७३ जणांनी अर्ज माघे घेतले. त्यामुळे सदस्यपदासाठी ११७० उमदेवार रिंगणात आहेत, अशी माहिती तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी दिली. वखार महामंडळाच्या गोदाममध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू असून या परिसरात दिवसभर गर्दी होती. माघारीसाठी राजकीय डावपेच आखले. वडझाकणसह ७५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या आहेत. त्यामुळे उद्यापासून रणधुमाळी सुरू होणार आहे. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित या दोन गटात सर्वत्र लढत आहे.

बातम्या आणखी आहेत...