आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्ह्याचा तपास:24  तासांतच मोबाइल दुकान फोडीचा गुन्हा आणला उघडकीस

नवापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील बस स्टँड परिसरातील अमीन मोबाइल दुकानात ३ सप्टेंबर २०२२ रोजी रात्री ९ वाजेनंतर झालेल्या चोरी प्रकरणातील आरोपीला नवापूर पोलिसांनी २४ तासांत अटक केली आहे. चोरट्याने मोबाइल अॅसेसरीजचे सामान, स्मार्ट वाँच (घड्याळ) तसेच ड्राॅवरमध्ये ठेवलेले ६ हजार रोख असे एकूण ७९ हजार ६५४ रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्याने चोरी केला होता. याबाबत नवापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असता नवापूर पोलिस ठाण्याचे सहा. निरीक्षक नीलेश वाघ यांनी गुन्ह्याचा तपास हवालदार दादाभाई वाघ यांच्याकडे दिला होता.

त्यांनी गुन्ह्याचा शोध लावत २४ तासांच्या आत आरोपीला मुद्देमालासह जेरबंद केले. नवापूर तालुक्यातील खेकडा येथील रंजित नीलेश मावची याने मोबाइलच्या दुकानात चोरी केल्याची माहिती मिळाल्याने त्यास खेकडा येथून ताब्यात घेतले. त्याने गुन्हा केल्याची कबुली देऊन गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल हा त्याच्या राहत्या घराच्या गायींचा गोठ्यात लपवून ठेवलेला होता. गुन्ह्यातील ३ नवीन मोबाइल, अॅसेसरीज, स्मार्ट घड्याळ तसेच रोख ३ हजार असे ७१ हजार ७२६ रुपये किमतीचा मुद्देमाल हा जप्त केला आहे.

बातम्या आणखी आहेत...