आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्साह:सभापतींच्या हस्ते साडी‎ चोळी देऊन झाला‎ महिलांचा सन्मान‎

नंदुरबार‎23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

८ मार्च हा जागतिक महिला दिवस‎ आज सर्वत्र उत्साहात साजरा‎ करण्यात आला. चौपाळे येथील‎ वनराई महिला बहुउद्देशीय विकास‎ संस्थेच्या वतीने जागतिक महिला‎ दिवस मोठ्या उत्साहात साजरा‎ करण्यात आला. यावेळी महिला‎ दिनाचे औचित्य साधत सर्व‎ महिलांच्या साडी चोळी व पुष्पगुच्छ‎ देऊन सन्मान करण्यात आला.‎ कार्यक्रमाच्या अध्यक्ष पं.स.‎ सभापती माया माळसे ह्या तर प्रमुख‎ पाहुणे म्हणून जि.प. सदस्य जागृती‎ मोरे, चाैपाळेच्या सरपंच सरला‎ चौधरी, सामाजिक कार्यकर्ता‎ सुलभा महिरे, अॅड.प्रज्ञा वडनगरे,‎ अॅड.सीमा खत्री, अॅड.श भांगी‎ चौधरी, शोभा बारी, वनराई महिला‎ बहुउद्देशीय विकास संस्थेच्या‎ संचालक राणी गावित, उपाध्यक्ष‎ रंजना गावित, मीरा पाडवी, ललिता‎ गावित, रंजना वसावे, रेखा गावित,‎ लीना गावित, चौपाळेचे पोलिस‎ पाटील योगेश ठाकरे, ग्रा.पं. सदस्य‎ चंदर ठाकरे, संतभूमी जनकल्याण‎ समितीचे अध्यक्ष गणेश गिरासे,‎ विजय ठाकरे, योगेश शिंदे, सरदार‎ पिंपळे, दत्तात्रय कुमावत, शिवनाथ‎ पिंपळे रामेश्वर पटेल, कनीलाल‎ वळवी, वळवी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...