आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला दिन विशेष:महिला दिनानिमित्त; कोरोना काळात उत्तम कामगिरी केलेल्या ११९ महिलांचा सन्मान

नंदुरबार6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा पोलिस दलातील महिला पोलिस अधिकारी, महिला अमलदार, आरोग्य विभागातील महिला अधिकारी व आशा वर्कर यांनी कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा जिल्हा प्रकल्प अधिकारी मीनल करनवाल यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील व त्यांच्या पत्नी रचना पाटील, अपर पोलिस अधीक्षक विजय पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा फडोळ, उप विभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे, अतिरिक्त अधीक्षक अभियंता कोठारे, पोलिस उपअधीक्षक आत्माराम प्रधान यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

मीनल करनवाल म्हणाल्या, एसटी बसची चालक ते नासा ह्या आंतरराष्ट्रीय संशोधन क्षेत्रात महिलांनी आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. आजची स्त्री पुरुषांप्रमाणेच आपल्या कुटुंबाचा आर्थिक भार उचलण्यात सक्षम बनलेली आहे. विवाह झालेली स्त्री सासर व आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळून ती निवडलेल्या क्षेत्रात आपली जबाबदारी चोखपणे पार पाडत आहे. पोलिस दलात महिला पोलिसांचे प्रमाणही लक्षणीय आहे. पोलिस दलात पोलिस शिपाई ते अनेक मोठ्या पदांवर महिला आपले कर्तव्य व जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडताना दिसत आहे. आरोग्याची जबाबदारी घेतलेल्या पोलिस व आरोग्य विभाग अहोरात्र मेहनत घेऊन कर्तव्य पार पाडत होते. त्यांच्या कोरोना महामारीतील कर्तव्यामुळे त्यांना कोरोना योद्धा म्हणून संबोधले गेले.

या कोरोना योद्ध्यांचा केला सत्कार
नंदुरबार पोलिस दलातील ३१ महिला अधिकारी व अंमलदार, जि.प. येथील २३ वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेविका, आशा गटप्रवर्तक, शहादा तालुक्यातील १४ वैद्यकीय अधिकारी व आरोग्यसेविका, आशा गटप्रवर्तक, तळोदा तालुक्यातील १२ वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेविका, आशा गटप्रवर्तक, जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथील ५१ महिलांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...