आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रारंभ:देहली प्रकल्पाचे अंतिम टप्प्यातील काम अखेर पोलिस बंदोबस्तात सुरु

अक्कलकुवा16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या ४० वर्षांपासून रखडत असलेल्या देहली प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सुटत नसल्याने ३ महिन्यापूर्वी सुरु झालेले अंतिम टप्प्यातील घळ भरणीचे काम हे गेल्या १० दिवसात प्रकल्प ग्रस्तांनी दोन वेळा बंद पाडले होते. त्यानंतर प्रांताधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी प्रकल्पग्रस्तांची बैठक घेऊन अन्याय न होऊ देण्याचे आश्वासन दिल्यानंतर अखेर पोलिस बंदोबस्तात प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली आहे.

प्रकल्प ग्रस्तांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी २६ रोजी काम बंद पाडले होते. त्यामुळे अधीक्षक अभियंता, उपअभियंता व शाखा अभियंता यांनी तात्काळ आंबाबारी पुनर्वसन येथे जाऊन प्रकल्पग्रस्त व लोक संघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांच्या सोबत बैठक घेतली. तर पालकमंत्री के.सी.पाडवी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकल्पग्रस्तांची बैठक घेऊन पुढील कार्यवाही होत असल्याबाबत प्रकल्पग्रस्तांना अवगत केले होते. त्यानुसार प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू होताच २५ ते ३० लोकांनी पुन्हा काम बंद पाडले. त्यामुळे ५ रोजी प्रांताधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी प्रकल्प स्थळी येथे येऊन जुन्या गावठाणात प्रकल्पग्रस्तां सोबत बैठक घेऊन प्रकल्प ग्रस्तांच्या मागण्यांवर शासन व प्रशासनाकडून युध्द पातळीवर कार्यवाही सुरू असल्याचा विश्वास दिला.

शेत जमीन विक्रीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन
देहली प्रकल्पाच्या प्रकल्प बधितांना स्वाभिमान सबळीकरण योजनेअंतर्गत तालुक्यात शेत जमीन देणे आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना स्वाभिमान योजनेत आपली शेत जमीन विक्री करावयाची असेल त्या शेतकऱ्यांनी आपल्या शिवारातील तलाठी किंवा प्रकल्प अधिकारी तळोदा, तसेच तहसिल कार्यालय अक्कलकुवा येथे संपर्क साधावा असे आवाहन तहसीलदार सचिन मस्के यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...