आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:व्यवसायासाठी तरुण शेतकऱ्यांनी फुलवली फुलशेती

तळोदा4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतीसारख्या व्यवसायात हल्ली कमी उत्पन्नामुळे शेतकऱ्यांची काही तरुण मुले लांब जात असतानाच वेगळा प्रयोग करून पारंपरिक पिकांची नाही तर स्वतः वेगळा व्यवसायासाठी उपयुक्त अशी शेती करत तळोदा तालुक्यातील तरुण शेतकऱ्यांनी इतर तरुणांपुढे आदर्श ठेवला आहे. काजीपूर शिवारात एकूण तीन एकर क्षेत्रात शेवंती, गुलाब, झेंडू आदी विविध फुलांची शेती करत आहेत.

तळोद्यासारख्या ग्रामीण भागात फुलांचा व्यवसाय करताना सर्व फुले उपलब्ध हाेत नसल्याने नाशिकसारख्या परिसरातून महागडी फुले आणून त्याची अतिशय कमी नफा कमावून विक्री करावी लागत होती. त्यामुळे प्रचंड परिश्रम घेवूनही अपेक्षित आर्थिक फायदा व उत्पन्न मिळत नव्हते. मग स्वतः शेती करण्याचा धाडसी निर्णय या तरुणांनी घेतला. शेती करण्याचा निर्णय घेत एक यशस्वी प्रयोग करून उत्पन्न कसे मिळवता येईल, याचा आदर्श निर्माण केला.

शहरातील कार्यक्रमांसाठी फुलांची आवश्यकता असते. पूर्वीपासून वडिलांचा व्यवसाय असलेले सुनील माळी व त्यांचे धाकटे बंधू शिरीष माळी येथील मारुती मंदिर शेजारी फुलांचा व्यवसाय करतात. ते बाहेर गावाहून फुले मागवतात. मात्र अनेकदा वेळा नाजूक असणारी फुले लवकर सडून जातात. त्या मुळे माेठे नुकसान सोसावे लागले. आर्थिक फटका सहन करावा लागत असे. झेंडू व्यतिरिक्त इतर फुलांची लागवड केल्यास उत्पन्न अपेक्षित येत नसे. व्यवसायाला अधिक उत्तमरीत्या वाढविण्यासाठी त्यांनी स्वत: फुल शेतीचा निर्णय घेत ताे यशस्वी करून दाखवला आहे.

फुलविक्रीची व्यवसाय वाढीला झाली मदत
दरम्यान स्वत:च आवश्यक फुलांचे उत्पादन घेण्यास सुरुवात केल्यापासून सुनील व शिरीष माळी यांचा फुलांच्या व्यवसायाला माेठी मदत झाली आहे. त्यामुळे आता ग्राहकांची संख्याही वाढू लागली असून व्यवसाय वाढीसाठीही माेठा आधार मिळाला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या या प्रयाेगाची दखल घेतली असून ते मार्गदर्शनासाठी त्यांच्याकडे येतात. त्यांचा सल्ला घेऊन आपल्या शेतात विविध उपयुक्त व दर्जेदार फुलांचे उत्पादन घेऊ लागले आहेत.

बातम्या आणखी आहेत...