आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील नर्मदा काठावरील अतिदुर्गम भागात असलेल्या गेंदामाळ गाव परिसरातील एका ८० फूट खोल दरीत पडलेल्या तरुणास तब्बल २१ तासानंतर बुधवारी सकाळी साडेआठ वाजता बाहेर काढण्यात आपत्ती व्यवस्थापन दल व प्रशासनाला यश आले.
हा तरुण मध्य प्रदेश राज्यातील रहिवासी असून संजय पावरा असे त्याचे नाव आहे. ताे मोटार कुंड येथील रहिवासी असून ताे मनोरुग्ण असल्याचा प्रशासनाला संशय आहे. मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास दरीतून वाचवण्यासाठी आवाज येत असल्याचे स्थानिक गावकऱ्यांच्या लक्षात आले. भूषा येथील सरपंचांनी पोलिस आणि वन विभागाला घटनेची माहिती दिली.
मात्र या तरुणाला बाहेर काढण्यात अपयश आल्याने राज्य आपत्ती निवारण दला (एसडीआरएफ)च्या पथकाला धुळे येथून बोलावण्यात आले. रात्री ११ वाजेच्या सुमारास एसडीअारएफचे पथक दाखल झाले. मात्र रात्री घटनास्थळी जाणे अवघड असल्याने सकाळी घटनास्थळ गाठून बचावकार्य सुरू केले.
स्थानिकांची मदत घेत दाेराच्या सहाय्याने दरीत उतरून पथकातील सदस्यांनी त्यास बाहेर काढले. २१ तासांपेक्षा जास्त काळ हा तरुण दरीत अडकून होता. बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास संजय पावरा यास बाहेर काढण्यात यश आले. दरम्यान, संजय हा मनोरुग्ण असल्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. त्याला कुठलीही माहिती त्यास सांगता येत नव्हती. बचावकार्यात पोलिस निरीक्षक सोनवणे, पोलिस उपनिरीक्षक राठोड व त्यांचे पथक, येथील पोलिस उपनिरीक्षक राहुल पाटील, हवालदार पाडवींनी सहकार्य केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.