आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने १० विशेष अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईपर्यंत तीन विशेष गाड्या धावतील. सहा विशेष गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई / दादर ते सेवाग्राम / अजनी / नागपूर व एक विशेष गाडी अजनी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत राहील.
विशेष गाडी क्रमांक ०१२६२ नागपूरहून सुटेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला दुसऱ्या दिवशी दुपारी ३.३० वातजा पोहोचेल. गाडी क्रमांक ०१२६४ ही ५ डिसेंबरला सकाळी ८ वाजता नापूरहून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ११.४५ वाजता मुंबईला पोहोचेल. ०१२६६ ही गाडी ५ डिसेंबर रोजी दुपारी ३.५० वाजता नापूरहून निघून दुसऱ्या दिवशी मुंबईला पोहोचेल. सुपरफास्ट गाडी क्र. ०२०४० अजनी येथून ७ डिसेंबर रोजी १.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४.१० वाजता मुंबईला पोहोचणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.