आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगाव:दहा वर्षांच्या कार्तिकची वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 7 हजार 400 रुपयांची रोख मदत

चोपडाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • टॅब घेण्यासाठी जमा केलेले पैसे कोरोनाग्रस्तांचा मदतीसाठी दिले, या वृत्तीचे सर्वत्र होतेय कौतुक

(प्रवीण पाटील)

चोपड्यातील दहा वर्षांच्या चिमुकल्याने आज आपल्या वाढदिवसा निमित्ताने वर्षभर जमा झालेले खाऊचे 7 हजार 400 रुपये कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिले आहे. सदर निधी त्याने तहसीलदार अनिल गावित यांच्याकडे जमा केला आहे. कार्तिक पवार असे या दात्याचे नाव आहे. या चिमुकल्याच्या कृतीने सर्वच भारावले असून त्याच्या पुढील भविष्यासाठी त्याला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

कार्तिक पवार याचा 8 मे रोजी दहावा वाढदिवस होता. त्या निमित्ताने त्याने टी.व्ही वरील बातम्यांमधून प्रेरणा घेत स्वतःच्या गल्ल्यात जमा झालेले पैसे कोरोना बाधितांच्या मदतीसाठी देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार वडील जगदीश पवार यांनी त्याच्याकडे जमा झालेले 7 हजार 400 रुपयांची रक्कम त्याला सोबत घेऊन तहसीलदार अनिल गावित यांच्याकडे दिली. यापूर्वी कार्तिकने वेले येथील मनोरुग्णांना फळे व बिस्कीटाचे वाटप करत एका वेगळ्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा केला. पैसे देतेवेळी चोपडा पालिकेचे गटनेते जीवन चौधरी, सेनेचे शहरप्रमुख आबा देशमुख, साहिल पवार, स्वप्नील बाविस्कर, महेंद्र साळुंखे, प्रसाद पाटील उपस्थित होते.

कार्तिक हा चोपडा येथील चावरा इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये चौथीत शिक्षण घेतो. कार्तिकने टॅब घेण्यासाठी जमा केलेले पैसे दिल्याने आम्हाला देखील त्याचा आनंद झाला असल्याचे काका महेश पवार व वडील जगदिश पवार यांनी 'दिव्य मराठी' शी बोलताना सांगितले.

बातम्या आणखी आहेत...