आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च-एप्रिल महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा यंदाचा ऑनलाइन निकाल शुक्रवारी जाहीर झाला. जळगाव जिल्ह्याचा निकाल ९५.७२ टक्के लागला. पारोळा शहरातील डॉ. व्ही. एम. जैन माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी नुपूर जितेंद्र चंद्रात्रेने १०० पैकी १०० टक्के गुण मिळवले. जिल्ह्यात यंदा सर्वाधिक २७ हजार विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले तर १९ हजार विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी यश मिळवले. जळगाव जिल्ह्यातून यंदा ५७ हजार ८८ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले होते. त्यातून ५४ हजार ६४६ उत्तीर्ण झाले आहेत. २७ हजार २४१ विद्यार्थी हे विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. तर १९ हजार १८८विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत, ७ हजार २५३ द्वितीय श्रेणीत तर ९६३ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. यंदाही जळगाव जिल्ह्यात सावित्रीच्या लेकीच हुशार ठरल्या. निकालात पुन्हा एकदा मुलांपेक्षा मुलीच हुशार असल्याचे दिसून आले. जिल्ह्याच्या निकालात मुलींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९६.५४ टक्के आहे तर मुलांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी मुलींपेक्षा कमी म्हणजे ९४.६७ टक्के इतकी आहे.
जळगाव शहरातील श्रद्धा दांडगेला ९९ टक्के गुण दहावीच्या निकालात जळगाव शहरातून ९९ टक्के गुण प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूलच्या श्रद्धा जितेंद्र दांडगे हीने मिळवले आहे. त्यापाठोपाठ ओरियन इंग्लिश मीडियम स्कूलच्या मृदुला श्याम साळुंखे हिने ९८.८० टक्के तर शानभाग विद्यालयाच्या दिशा दीपक ढाके हिने ९८ टक्के गुण मिळवत यश मिळविले आहे. त्यांच्या यशाचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कौतुक केले. नियमित अभ्यास, स्वअध्ययन व शिक्षकांचे मार्गदर्शन या मुळे परीक्षेत यश मिळाले असे श्रद्धा दांडगेने सांगितले.
जिल्ह्यातील पुनर्परीक्षार्थींचा निकाल यंदा ८१ टक्के जळगाव जिल्ह्यातील १ हजार ४ पुनर्परीक्षार्थींनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ९८६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातून ८०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याचा निकाल ८१.५४ टक्के लागला आहे. नाशिक विभागात जिल्हा येथेही दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. पुनर्परीक्षार्थीत २५ विद्यार्थी हे विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. तर १२९ विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत, ५९ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ५९१ तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
शहरातील ६९पैकी ३० शाळांचा निकाल १०० टक्के... जळगाव शहरातील ६९पैकी ३० शाळांचा निकाल यंदा १०० टक्के लागला. संस्थाचालकांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला. शाळांसोबतच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत निकालाचा टक्काही वाढला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा कल या वर्षी आयटीआयकडे असल्याचे दिसून आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.