आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षवल्ली आम्हा सोयरे:यशवंत कॉलनीतील खुल्या भूखंडात सांडपाणी आणि बोरिंगच्या पाण्यावर पिता-पुत्राने जगवली 100 प्रकारची झाडे

जळगाव12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिंग रोडजवळील यशवंत कॉलनीतील खुल्या भूखंडात सांडपाणी आणि बोरिंगच्या पाण्यावर पिता-पुत्राने 100 प्रकारची झाडे जगवली आहेत. नाल्यावरील सांडपाणी पाहिजे, तेव्हा अडवून पाणी पाणडुबीद्वारे झाडांना दिले. तसेच बोरिंगद्वारेदेखील अनेकदा या झाडांना पाणी देत गेल्या दोन वर्षांपासून पिता अनिल अग्रवाल व मुलगा अनूज अग्रवाल यांनी भर उन्हाळ्यात गेल्या दोन वर्षांपासून विविध जातीची फुलझाडे, शोभेची झाडे व मोठे वृक्ष स्वखर्चाने जगवली.

कोरोनाच्या लॉकडाऊनचा काळ या पिता-पुत्रांनी येथे वृक्षवेली फुलवण्यात घालवला. झाडांना व्यवस्थित पाणी देता यावे, यासाठी या पिता-पुत्राने येथे ठिंबक, स्प्रिंक्लर, बांबू, पानडुबीही बसवून घेतली. कोरोनाचा लॉकडाऊन काळ अनेकांसाठी जीवघेणा ठरला. या काळात सर्वच उद्योगधंदे ठप्प झाले होते. या काळाचा सदुपयोग करत या पिता-पुत्राने या खुल्या भूखंडात विविध जातीची वृक्ष लावली. यात शोभोच्या झाडांसह फळझाडे, फूलझाडे तर लावलीच. याचबरोबर मोठे डेरेदार वृक्षदेखील लावले आहेत. यात या पिता-पुत्राने 100 हून अधिक वृक्ष जगवण्यात हातभार लावला.

वृक्षवाढीसाठी 50 हजारावर खर्च

या खुल्या भूखंडावर अनिल अग्रवाल व त्यांचा मुलागा अनूज अग्रवाल व निस्वार्थ सेवा देणारा शरद जाधव यांनी ही वनराई फुलवली आहे. स्प्रिंकलर, बांबू, पाणडुबी व ठिंबकसाठी अनिल अग्रवाल यांनी 50 हजारांच्यावर खर्च केला आहे. तसेच येथे तयार होणारे रोप, दिंडीमध्ये जाणाऱ्या महिलांना तुळशीसह कुंडी अग्रवाल स्वखर्चाने पुरवतात.

या वृक्षवेली येथे फुलवल्या

सांडपाण्यातून या खुल्या भूखंडावर निंब, वड, पिंपळ, निलगिरी, गुलमोहर आदी मोठे वृक्ष वाढत आहेत. याचबरोबर पपई, चिकू, पेरू, आंबा, आवळा, चिंच, केळी, ऊस, बदाम, जांभूळ, पपई, नारळ ही फळझाडे देखील अग्रवाल यांनी लावली आहे. तसेच फुलझाडांत चांदणी, कण्हेर, जासवंदीसह मोरपंखी, मनीप्लॅट, अशोक वृक्ष, बांबू आदी 100 हून वेगवेगळ्या जातीचे वृक्ष फुलवली आहे.

बातम्या आणखी आहेत...