आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठाचे राजकारण तापले:अधिसभा अन‌् विद्यापरिषद निवडणुकीत 103 अर्ज वैध

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अधिसभा, विद्यापरिषद निवडणुकीसाठी १०३ उमेदवारी अर्ज वैध ठरले. अभ्यास मंडळांसाठी उमेदवारी अर्जांची छाननी उशिरापर्यंत सुरू होती. विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. १५ व १६ डिसेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. शनिवारी प्राप्त उमेदवारी अर्जांची छाननी झाली.

अधिसभेसाठी महाविद्यालयीन अध्यापकांमधून १० जागा निवडून द्यावयाच्या असून, ७२ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी ५७ अर्ज वैध ठरले तर १५ अर्ज अवैध ठरले. विद्यापीठ अध्यापकांमधून तीन जागांसाठी नऊ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी सात वैध ठरले तर दाेन अवैध ठरले, प्राचार्यांमधून १० जागा असून १६ अर्ज दाखल झाले. त्यापैकी १५ वैध तर १ अवैध ठरले. व्यवस्थापन प्रतिनिधींच्या गटांमधून सहा सदस्य निवडून दिले जाणार आहेत. त्यासाठी १३ अर्ज दाखल झाले होते. पैकी सहा वैध तर सात अवैध ठरले.

बातम्या आणखी आहेत...