आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाैकशी‎:दहावी इंग्रजी प्रश्नपत्रिका बदल‎ प्रकरणी तिघांची हाेणार चाैकशी‎

जळगाव13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहावीच्या परीक्षेचा‎ सोमवारी इंग्रजी या विषयाचा पेपर‎ झाला. या वेळी प. न. लुंकड कन्या‎ शाळेतील केंद्रावर मराठी माध्यमातील‎ २४ विद्यार्थ्यांना काठिण्य पातळी जास्त‎ असलेल्या इंग्रजी माध्यमाची‎ प्रश्नपत्रिका दिली गेली.

या घटनेचा‎ अहवाल केंद्रसंचालक तथा‎ मुख्याध्यापिका स्वाती नेवे यांनी‎ नाशिक मंडळाला पाठवला अाहे.‎ बुधवारी हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर‎ केंद्रसंचालक, केंद्र उपसंचालक व‎ सुपरवायझर या तिघांची चौकशी‎ करण्याचे आदेश मंडळाचे अध्यक्ष‎ नितीन उपासनी यांनी दिले. मंडळाच्या‎ सहायक सचिव मंदाकिनी देवकर ह्या‎ चौकशी करणार आहेत. विद्यार्थ्यांच्या‎ उत्तरपत्रिका स्वतंत्रपणे तपासल्या‎ जातील. त्यांच्यावर अन्याय होऊ देणार‎ नाही असे उपासनी यांनी सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...