आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभ्यासक्रम जानेवारीपासून:विधी शाखेची 10 राेजी गुणवत्ता यादी ; प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर

जळगाव8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधी शाखेच्या तीन व पाच वर्षे कालावधीच्या पदवी अभ्यासक्रमाचे वेळापत्रक नुकतेच जाहीर झाले. कॅप राउंडची प्रक्रिया डिसेंबर महिन्यापर्यंत सुरू राहणार आहे. नियमित वर्ग सुरू होण्यासाठी जानेवारी महिना उजाडेल. परिणामी अभ्यासासाठी एक महिन्याचा कालावधी शिल्लक राहील.

इयत्ता बारावीनंतर पाच वर्षाच्या एलएलबी अभ्यासक्रमाचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे. पदवीधर विद्यार्थ्यांना तीन वर्षांत हा अभ्यासक्रम पूर्ण करता येतो. सीईटी सेलतर्फे या अभ्यासक्रमाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सध्या दोन कॅप राऊंडचे वेळापत्रक आहे. त्यानंतर महाविद्यालय स्तरावरील फेरीद्वारे प्रवेश दिले जाणार आहेत. विविध राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना कागदपत्र उपलब्ध करावी लागणार असल्याने त्यानुसार जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र दुसऱ्या राउंडच्या अंतिम तारखेपर्यंत देण्याची मुदत असेल.