आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्जामुळे अवसायनात निघालेल्या बंद कंपनीचे भंगार न देता पैसे घेऊन विक्रेत्याची ११ लाख रुपयांत फसवणूक केल्याचा प्रकार समाेर आला आहे. भंगार विक्रेता व्यापारी हा जळगावच्या मेहरूणमधील रहिवासी असून, या प्रकरणी एमआयडीसी पाेलिसांत पुणे येथील दाेघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा शनिवारी दाखल करण्यात आला आहे.
वाकडी येथे कर्जामुळे बंद पडून अवसायनात गेलेली कंपनी दिल्ली येथील मेट्राे टेक्नाॅलाॅजिस्ट प्रा. लि. या कंपनीने घेतली आहे. या कंपनीने हैदराबादच्या महाशिवशक्ती कंपनीला कंपनीचे काम दिले आहे. तर भंगार विक्रीचे काम पुणे येथील संताेष खुडे आणि चंदू जाधव (दोन्ही रा. कासेवाडी, भवानीपेठ, स्वारगेट, पुणे) यांना साेपवले आहे.
या दाेघांनी मेहरूण परिसरातील गुलाबबाबा काॅलनीतील अब्दुल जब्बार कादर पटेल (वय ५७) व भागीदार तानाजी शिंगाडे या भंगार खरेदी-विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांशी व्यवहार केला. खुडे आणि जाधव यांनी अब्दुल पटेल व तानाजी शिंगाडे यांच्याकडून ११ लाख ९० हजार रुपये घेऊन भंगार देण्याचे ठरले; परंतु त्यांनी भंगार न देता त्यांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या संदर्भात अब्दुल पटेल यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात सविस्तर तक्रार दिली आहे. त्यावरून शनिवारी संशयित आरोपी संतोष गुलाब खुडे आणि चंदू जाधव यांच्याविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अमोल मोरे करीत आहे. दरम्यान, फसवणुकीच्या घटना वाढल्या असून नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.