आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट पासेस:जिल्ह्यात ११ विद्यार्थ्यांकडे ‘एसटी’च्या बनावट पासेस; झेराॅक्सच्या दुकानात २० रुपयात मिळायची पास

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या दोन शालेय विद्यार्थ्यांकडून बनावट पासेस बुधवारी आढळल्या हाेत्या. त्यानंतर गुरुवारी एसटी प्रशासनाने दोन पथके तयार करुन निवडक मार्गावर तपासणी केली. त्यात ११ विद्यार्थ्यांकडे बनावट पासेस सापडल्या. या सर्व विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

नशिराबाद ते जळगाव दरम्यान एसटी प्रवास करीत असलेल्या दोन विद्यार्थ्यांकडे बुधवारी बनावट पासेस मिळून आल्या. वाहकाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड झाला. या दोन्ही विद्यार्थ्यांवर जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही गंभीर बाब समोर येताच विभाग नियंत्रक भगवान जगनाेर यांनी गुरुवारी दोन स्वतंत्र पथक तयार करुन तपासणीला पाठवले. आसोदा, भादली, नशिराबाद या मार्गांवर ही तपासणी करण्यात आली. त्यात ११ बनावट पासेस मिळून आल्या. एसटी विभागाने ही माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार दाखल गुन्ह्यात इतर विद्यार्थ्यांची नावे वाढवण्यात येणार आहेत. ही तपासणी सुरूच राहणार आहे. अशी माहिती विभाग नियंत्रक जगनोर यांनी दिली. दरम्यान, जळगाव येथील ज्या झेराॅक्स दुकानावरुन विद्यार्थ्यांना बनावट पासेस मिळत हाेत्या. ताे दुकानदार ही संशयाच्या भाेवऱ्यात असून या दुकानदाराने अजून किती विद्यार्थ्यांना पासेस तयार करुन दिल्या आहेत, याची चाैकशी हाेणे गरजेचे आहे.

जळगावचा झेराॅक्स दुकानदारही संशयित
विद्यार्थ्यांना प्रवासी पास देण्यासाठी जिल्हाभरात व्यवस्था करण्यात आली आहे. साधारणत: १५० ते २०० रुपयांची मासिक पास विद्यार्थी काढतात. परंतु, आता बनावटीकरण करुन हीच पास त्यांना २० रुपयात बनवून मिळते आहे. बस स्थानकाशेजारी असलेल्या देशपांडे मार्केटमधील एक झेरॉक्स दुकानदार बनावट पास तयार करुन देत असल्याची माहिती विद्यार्थ्यांकडून पाेलिसांना मिळाली. त्यामुळे आता दुकानदारासही संशयित आरोपी केले जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...