आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MPSC स्थापत्य अभियांत्रिकी सेवा भरती:1143 उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत; त्रस्त उमेदवारांचे मुंबईतील आझाद मैदानावर साखळी उपोषण

जळगाव25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एमपीएससीच्या स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2019 रोजी झाली. तब्बल साडेतीन वर्षे उलटूनही अद्यापही परीक्षा दिलेल्या या 1143 उमेदवारांना शासनाने नियुक्तीच दिली नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या या उमेदवारांनी थेट मुंबईतील आझाद मैदान येथे साखळी उपोषण सुरू केले आहे.

दरम्यान असे असताना दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात एमपीएससीमार्फत वर्ग-1 आणि वर्ग-2 अधिकारी पदांच्या भरतीत 161 जागांची भर पडली. त्यामुळे येणाऱ्या काळात उत्तीर्ण उमेदवारांच्या नियुक्तीची मोठी अडचण सरकारपुढे उभी राहणार आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने 462 जागा भरण्याचे निश्चित केले होते. आता ही भरती 623 जागांसाठी होणार आहे. त्यात सर्वाधिक 139 जागा उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या आहेत. उपजिल्हाधिकारी 33, तर पोलिस अधिकाऱ्यांच्या 41 जागा आहेत. 21 ऑगस्ट रोजी पूर्वपरीक्षा झाली. मुख्य परीक्षेनंतर एप्रिल-2023 पर्यंत प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे आयोगाने कळवले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 11 मे 2022 रोजी एक जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यात ऑगस्ट-2022 दरम्यान गट-अ आणि गट-ब या संवर्गातील 462 जागांची भरती केली जाणार होती. पण, मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यकाळात 31 ऑक्टोबर रोजी पुन्हा दुरुस्तीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

नवीन जाहिरातीनुसार उपजिल्हाधिकाऱ्यांची 33 पदे असून महिलांसाठी 10 तर खेळाडूंसाठी एक जागा राखीव आहे. डीवायएसपी, एसीपींच्या 41 जागांपैकी 29 पुरुष, तर 12 महिला राहतील. जीएसटीच्या सहायक आयुक्तांच्या 47 जागांपैकी 31 पुरुष, तर 15 महिला आहेत. तहसीलदारांच्या 25 जागांपैकी 17 पुरुष, तर 7 महिला आहेत. उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या 139 जागांपैकी 92 पुरुष, तर 39 महिला आहे. खेळाडूंसाठी 8 जागा आहेत. स्कूल इन्स्पेक्टरच्या 88 जागांपैकी 55 पुरुष, 29 महिलांचा समावेश असून 4 खेळाडूंना प्राधान्यक्रम दिला जाणार आहे. गटविकास अधिकारी पदाच्या 14 जागा असून 9 पुरुष, तर 5 स्त्रियांना संधी दिली जाईल. सहायक गटविकास अधिकाऱ्याच्याही 80 जागा आहेत. त्यापैकी 53 पुरुषांना, तर 24 जागी महिलांना सामावून घेतले जाणार आहे. खेळाडूंना 3 जागांवर आरक्षण आहे. दरम्यान, या सर्व जागांसाठी सामाजिक आरक्षणाचे तंतोतंत पालन केले जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...