आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम:जंकफूड, लठ्ठपणामुळे 12  टक्के बालकांना वाढला मधुमेहाचा त्रास

जळगाव14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदलत्या जीवनशैलीचा मोठ्या व्यक्तींप्रमाणेच लहान मुलांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहेे. लहान मुलांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, कोरोना काळात मुले घरातच असल्याने व्यायाम बंद झाला व जंकफूड खाण्याचे प्रमाण वाढले, परिणामी मुलांत लठ्ठपणा वाढत गेला.याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होत असून, मधुमेह होणाऱ्या बालकांत दोन वर्षांत सुमारे १० ते १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यात टाइप २च्या रुग्णांची संख्या वाढत असून, ती चिंताजनक आहे. गेल्या काही वर्षांमध्ये लहान मुलांची जीवनशैली पूर्ण बदलेली आहे. मुलांना खेळण्यास शाळेत वा घराच्या बाजूला मैदाने उरलेली नाहीत.

मुले शाळेत बसून असतात. घरी आल्यावर टीव्ही, संगणक वा मोबाइल घेऊन बसतात. आई-वडील दोघेही नोकरी करत असल्याने मुलांच्या शारीरिक वाढीकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. तसेच वाढते जंकफूडचे प्रमाण व खाण्याच्या चुकीच्या वेळा यामुळे मधुमेह होण्यासाठी सुयोग्य वातावरण तयार झाले आहे. चुकीच्या जीवनशैलीमुळे या आजारांना मुलांना सामोरे जावे लागत आहे. लहान मुलांत टाइप वन मधुमेह आहे. असे निदान झाल्यावर कुटुंबाने त्या मुलाची विशेष काळजी घ्यावी. टाइप वन मधुमेह हा आयुष्यभराचा व जीवनशैलीशी निगडित आजार आहे. नियमित देखरेख, व्यायाम यांना सुयोग्य आहाराची जोड दिली तरच मधुमेह नियंत्रित होऊ शकतो.

वाढता ताणतणावही धाेकेदायक : महिलांमधील वाढता ताण हे मुलांमधील वाढत्या मधुमेहाचे मुख्य कारण आहे. महिलांच्या खाण्यापिण्याच्या सवयी, कौटुंबिक जबाबदारी व कामाचा ताण यामुळे महिलांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढताना दिसते. त्यामुळे गर्भवती महिलांद्वारे होणाऱ्या बाळाला जन्मताच मधुमेह होण्याची शक्यता असते. याचा परिणाम म्हणजे नवजात बालकाचे कमी असणारे वजन, जन्माच्या वेळी कमी वजन असणाऱ्या बालकांना जास्त खायला दिले जाते. त्यामुळे त्याच्या शरीरात साखरेचे प्रमाण वाढते. यामुळे नवजात बालकांमध्ये मधुमेहाचा धोका निर्माण होत आहे.

आनुवंशिकतेमुळेही होतेय वाढ : मुलांच्या जीवनशैलीतील बदल आजारांचे मुख्य कारण आहे. मधुमेहाचे प्रमाण बालकांमध्येही वाढत असून, टाइप १ हा पूर्वीही होता. मात्र आता टाइप २च्या रुग्णांमध्ये वाढ होत असून, यात आनुवंशिकता हे कारणही पुढे येतेय.- डॉ. अविनाश भोसले, बालरोगतज्ज्ञ

बातम्या आणखी आहेत...