आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनलॉकची तयारी:जिल्ह्यातील 1,200 हॉटेल्स, ढाबे उद्यापासून गजबजणार; कोरोनाचा संसर्ग रोखणारे नियम काटेकोर पाळावे लागणार

जळगाव16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही दिवसांपासून पार्सल व घरपाेच सेवा पुरविणारे हाॅटेल्स, रेस्टाॅरंट व ढाबे अाता पूर्ण क्षमतेने सुरू हाेणार अाहेत. शासनाचे अादेश निघताच हाॅटेल व्यावसायीकांनी कंबर कसली असून बैठक व्यवस्थेच्यादृष्टीने नियाेजन सुरू झाले अाहे. शहरातील १५० तर जिल्हाभरातील सुमारे १२०० हाॅटेल्स साेमवारपासून गजबजणार असल्याने जय्यत तयारी सुरू झाली अाहे. दरम्यान, अनलाॅकबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी अादेश काढले नसले तरी ते रविवारी निघण्याची शक्यता अाहे.

काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत रूग्णसंख्या वाढल्यानंतर राज्य शासनाने राज्यभरात निर्बंध लागू केले हाेते. या निर्णयामुळे हाॅटेल व्यावसायीकांना माेठे नुकसान साेसावे लागले अाहे. नागरीकांची गरज व मागणी लक्षात घेता काही दिवसांपासून शासनाने पार्सल सेवेला परवानगी दिली हाेती. परंतु, त्याला मिळणारा प्रतिसाद अल्प असल्याने हाॅटेल चालकांना अार्थिक फटका साेसावा लागल्याचे सांगीतले जात अाहे. दरम्यान, शुक्रवारी मध्यरात्री राज्य शासनाने अनलाॅकचा निर्णय घेतल्याने गेल्या ६२ दिवसांपासून लाॅक असलेले हाॅटेलचे दरवाचे खुले हाेणार अाहेत. त्यादृष्टीने हाॅटेल व्यावसायीकांनी तयारीला सुरूवात केली अाहे. शनिवारी दिवसभर साफसफाई सुरू हाेती.

कामगारांना फाेन करून बाेलावणे सुरू
हाॅटेल व्यवसायात ग्राहकांना सेवा देण्यासाठी सगळ्यात महत्वाचे मनुष्यबळ गरजेचे असते. परंतु, गेल्या दाेन महिन्यापासून केवळ पार्सल सेवा सुरू असल्याने कामगारांना घरी बसावे लागले हाेते. शासनाच्या अादेशानंतर हाॅटेल चालकांनी व्यवस्थापक, किचनमधील कारागीर, हेल्पर, वेटर, माेरी कामगार, चपाती करणाऱ्या महिला तसेच सुरक्षारक्षकांना फाेन करून बाेलावण्यास सुरूवात केली अाहे.

साफसफाई, वातावरण निर्मितीवर भर
अातापर्यंत बंद असलेल्या जिल्ह्यातील हाॅटेलमध्ये शनिवारपासून साफसफाईला गती देण्यात अाली अाहे. ग्राहक थेट हाॅटेलात येऊन जेवणाचा अास्वाद घेणार असल्याने बैठक व्यवस्था निटनेटकी करण्याचे काम सुरू झाले अाहे. ग्राहकांना प्रसन्न वाटेल, असे वातावरण निर्मितीसाठी बंद पडलेल्या व्यवस्था पुन्हा सुरू करण्यात येत अाहेत. दिवसभर याच कामात व्यावसायिक व्यस्त दिसले.

बुडालेला राेजगार अाता सुरू हाेणार
जळगाव शहरात ७० तर जिल्ह्यात ६०० परमीटर रूम बिअरबार अाहेत तर शहरात सुमारे ८० व जिल्हाभरात सुमारे ६०० रेस्टाॅरंट व ढाबे अाहेत. या व्यवसायासाठी शहरात साधारणत: ३००० तर जिल्हाभरात २० हजारापेक्षा जास्त मनुष्यबळ काम करते. हाॅटेल पुन्हा सुरू हाेणार अाहेत. अर्थात, अनेकांना बुडालेला राेजगार उपलब्ध हाेईल असे जळगाव जिल्हा रिटेल वाइ असाेसिएशनचे अध्यक्ष ललित पाटील यांनी सांगीतले.

मंगल कार्यालयांकडे सुरू झाली विचारणा
जळगाव | प्रशासनाकडून सोमवारपासून अनलॉकचे संकेत मिळाले अाहे. त्यात जळगावचाही समावेश असल्याने मंगलकार्यालयांकडे उर्वरित तारखांसाठी नागरिकांकडून विचारणा सुरू झाली आहे. लग्नसराई संपण्यात येत असली तरी जून व जुलै महिन्यात विवाहाच्या काही तारखा आहेत. सोमवारपासून अनलॉक होणार असल्याने नागरिकांनी याबाबत मंगलकार्यालयांकडे चौकशी सुरू केली आहे. मात्र, आजच्या तारखेला एकही मंगल कार्यालये, लॉन्स, हॉटेल यांच्याकडे लग्नकार्यासंदर्भात बुकिंग झालेली नाही. गेल्या दोन वर्षांपासून लग्नसराईच्या सीझनवर अवलंबून असलेल्या प्रत्येक घटकाचे आर्थिक गणित कोलमडले आहे. उर्वरित तारखांसाठी नागरिकांकडून चौकशीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, मंगलकार्यालयांची साफसफाई सुरू केली. अजूनही एकही तारीख बुकींग झालेली नाही. पण चाैकशीसाठी फाेन येऊ लागले अाहेत, असे शहरातील गुंजन मंगल कार्यालयाचे साेमा माळी यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...