आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा नियोजनच्या ८२ लाख ४४ हजार रुपयांच्या निधीतून भुसावळ तालुक्यातील ९ गावांमध्ये १३ रोहित्र मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील तसेच शेती वापराच्या विजेचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल. आगामी महिन्याभरात हे नवीन रोहित्र कार्यरत होतील, अशी आशा आहे. गावठाण व कृषी फीडरवरील वीज ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा व्हावा यासाठी ट्रान्सफॉर्मरची गरज असते.
मात्र सध्या ट्रान्सफॉर्मरचा तुटवडा निर्माण झाला आहे. तालुक्यातील ग्रामीण भाग व शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा व्हावा यासाठी जिल्हा नियोजन समितीने ८२ लाख ४४ हजार रुपये निधीतून ट्रान्सफॉर्मर मंजूर केले आहेत. यामध्ये भुसावळ तालुक्यातील वेल्हाळे ३, साकेगाव २, कुऱ्हेपानाचे २ तर सुरवाडे बुद्रूक, सुरवाडे खुर्द, किन्ही, मोंढाळे, गोजोरा, पिंप्रीसेकम प्रत्येकी एक असे १३ रोहित्र मंजूर आहेत. वारंवार ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड होतो. यामुळे शेतीसाठी सुरळीत वीजपुरवठा होत नाही.
काही ठिकाणी दाब वाढल्याने सध्याच्या ट्रान्सफॉर्मरची क्षमता कमी झाली आहे. या नवीन ट्रान्सफॉर्मर मुळे शेतकरी, गावठाण भागांना सुरळीत व पूर्ण दाबाने वीजपुरवठा होईल. तालुक्यातील नऊ गावांमध्ये नवीन १३ रोहित्र मंजूर झाले आहेत. त्यामुळे आगामी काळात उन्हाळ्यात ऐन गरजेच्या वेळी शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने वीजपुरवठा होणार आहे. उन्हाळ्यात पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांनी अखंड वीजपुरवठा आवश्यक असतो. याच काळात घरगुती तसेच औद्योगिक वापर वाढत असल्याने, वीजपुरवठ्यात तांत्रिक अडचणी निर्माण होऊन पुरवठा खंडीत होतो. मात्र, आता ही समस्या निकाली निघेल. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
वरणगाव भागासाठी सुरू आहे पाठपुरावा
भुसावळ तालुक्यातील केवळ महावितरणच्या डीव्हीजनमध्ये येणाऱ्या भागांना ट्रान्सफॉर्मर मिळाले आहेत. आता मुक्ताईनगर डिव्हीजनमध्ये येणाऱ्या तालुक्यातील वरणगाव भागासाठीनवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर होतील. यासाठी आपला पाठपुरावा सुरु आहे. ओव्हरलोड कमी करण्यासाठी नवीन ट्रान्सफॉर्मर फायदेशीर ठरतील. - संजय सावकारे, आमदार
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.