आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइनरव्हील क्लब ऑफ जळगाव न्यू जेनतर्फे कॅन्सरग्रस्तांच्या मदतीसाठी १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास एमआयडीसीतील प्रेसिडेंट रिसॉर्टमध्ये विविध गीत गायन व नृत्याच्या चॅरिटी शोचे आयोजन करण्यात अाले आहे. या वेळी पवन झंवर व त्यांचे पथक विविध गीते व कार्यक्रम सादर करणार आहेत. या शो मधून जमा झालेली रक्कम ही कॅन्सरग्रस्तांच्या मदतीसाठी वापरली जाणार आहे. दरम्यान, इनरव्हील क्लब ऑफ जळगाव न्यू जेनतर्फे वर्षभरात विविध सामाजिक कार्यक्रम राबवले जातात. त्या अंतर्गत हा कार्यक्रम घेतला जात असल्याचे मंडळाच्या अध्यक्षा इशिता दोशी, हेतल सुरतवाला यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.