आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील अनेक भागात पुन्हा जोरदार पाऊस पडत आहे. जळगाव जिल्हाही मुसळधार पावसाने उध्वस्त झालेला आहे. येथील बोरी नदीला पूर आल्यानंतर अनेक गावे पाण्यात बुडाली आहेत आणि शहरापासून रस्त्यांचा संपर्क तुटला आहे. अनेक लहान पुल देखील पाण्यात वाहून गेले आहेत. दरम्यान, येथून एक हैराण करणारे चित्र समोर आले आहे.
बोरी नदीला पूर आलेला असल्याने येण्या-जाण्यास दूसरा रस्ता अथवा पूल नाही. याचवेळी गावातील 13 वर्षाची मुलगी तापाने फणफणत होती. गावातही डॉक्टर नाही. अखेरचा प्रयत्न म्हणून तिला उपचारांना नेण्यासाठी नदी काठावर आणले. मात्र दुर्दैवाने तिथेच नदीकाठी त्या निष्पाप बालिकेचा मृत्यू झाला.
आज सकाळी 10:30 वाजता सात्री येथील आरुषी सुरेश भिल वय 11 हिला नदीतून खाटेवरून नेत अधिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तीस मृत घोषित केले. ती गेल्या 2 तारखेपासून आजारी होती. गावात 70 ते 80 रुग्ण साथीच्या आजाराने ग्रस्त आहेत. व्हायरल इन्फेक्शनने येथे थैमान घातले आहे. गेल्या 15 दिवसापासून रुग्ण संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा पावसाच्या पुरामुळे पोहोचू शकत नाही. मुलीचा मृतदेह तहसीलदार आवारात नेण्यात आला आहे.
अशा प्रकारे बनवला पाण्यात वापरला जाणारा स्ट्रेचर
आरुषीचे कुटुंबीय तिला एका खाटेवर बसवून तिला गावाबाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. चारपाई पाण्यात बुडू नये म्हणून त्यांनी त्याखाली प्लास्टिकचे दोन रिकामे ड्रम बांधले होते. मात्र, त्यांचे प्रयत्न अपुरे पडले आणि मुलीची तब्येत वाटेत बिघडली आणि ती आधी बेशुद्ध झाली आणि नंतर तिचा मृत्यू झाला. आरुषीच्या मृत्यूनंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
ग्रामस्थ प्रशासनावर नाराज आहेत
माजी सरपंच महेंद्र बोरसे यांनी सांगितले की गावात व्हायरल फीवरचे अनेक रुग्ण आहेत. संपूर्ण गाव पाण्यात बुडाले आहे, पण कोणीही आमच्या मदतीला येत नाही. आज एका मुलीचा मृत्यू झाला असून प्रशासन जागे झाले नाही तर ही संख्या आणखी वाढू शकते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.