आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्सव:130 तपस्वींचा सामूहिक सन्मान; संस्कृती जपण्याचे केले आवाहन; आचार्य जयमलजींचा जन्मोत्सव साजरा

जळगाव22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तपस्वींचा सन्मान श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक, श्री अखिल भारतीय श्वेतांबर स्थानकवासी जयमल जैन श्रावक संघ, ऑल इंडिया जे.पी.पी. जैन महिला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आचार्य सम्राट १००८ जयमलजी यांच्या ३१५व्या जन्मोत्सवानिमित्त बुधवारी जैन हिल्स येथे कार्यक्रम झाला. यात १३० तपस्वींचा सामूहिक सन्मान करण्यात आला. तसेच डॉ. पदमचंद्रजी यांचे प्रवचनदेखील झाले.

कार्यक्रमात तपस्वींचा सन्मान कस्तूरचंद बाफना, शंकरलाल कांकरिया, अजय ललवाणी, सुशील बाफना, निशा जैन, शोभना जैन, डॉ.भावना जैन, ममता कांकरिया यांच्या हस्ते करण्यात आला. डॉ. पदमचंद्रजी यांनी ‘जैन’ शब्दाची व्याख्या प्रवचनातून सांगितली. यात आपली संस्कृती जपण्याचा संकल्प प्रत्येकाने केला पाहिजे. प्रत्येकाने स्वच्छता आणि स्वयंशिस्तीचे आचरण करून आचार्य जयमलजी यांनी दिलेल्या मार्गावर चालावे, असे सांगितले. या वेळी आचार्य प्रवर १००८ पार्श्वचंद्र मुनी, डॉ. पदमचंद्र मुनी, जयेंद्र मुनी, जयशेखर मुनी, जयधुरंधर मुनी, जयकलश मुनी, जयपुरंदर मुनी उपस्थित होते.

आज सामूहिक तेले तप प्रत्याख्यान
जैन हिल्स येथे गुरुवारी डॉ. पदमचंद्रजी यांचे सकाळी प्रवचन, मंगलाचरण, स्वागत गीत, अतिथी स्वागत, प्रस्तावना व गुरुभक्ती होईल. सामूहिक तेले तप प्रत्याख्यान होईल. दुपारी ११.४५ वाजता गौतम प्रसादी कार्यक्रम होणार असल्याचे, संघपती दलीचंद जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले आहे.

आपल्या जीवनातील अंध:कार दूर करा
जयधुरंधर मुनी, जैन समणी प्रमुख डॉ. सुयश निधी यांनीदेखील उपस्थित श्रावक-श्राविकांना आचार्य जयमलजी यांच्या विचारांवर मोक्ष प्राप्त होतो. आचार्यांनी दाखवलेल्या मार्गावर मार्गस्थ झाले पाहिजे. तसेच तपस्याचे महत्त्व सांगत जीवनातील अंध:कार दूर करण्यासाठी ते महत्त्वाचे असल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...