आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यांतर्गत बदल्यांमधील १३१० शिक्षकांना सोमवारी कार्यमुक्त करण्यात येणार आहे. तद्नंतर पदस्थापना मिळालेल्या ठिकाणी शिक्षकांना रुजू होऊन गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अहवाल सादर करावा लागणार आहे. बदलीच्या प्रक्रियेवेळी भरलेली माहिती चुकीची असल्याचे आढळून आल्यास संबंधित शिक्षकांवर कारवाई होणार असल्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले आहेत.
जिल्ह्यांतर्गत ऑनलाइन बदल्या गुरुवारी पार पडल्या. बदल्या झालेल्यांत संवर्ग सहामधील एका शिक्षकाने न्यायालयात धाव घेतली. यावर तात्पुरत्या स्वरूपात संबंधित शिक्षकास कार्यमुक्त करू नये, असे आदेश न्यायालयाने दिले. उर्वरित शिक्षकांना शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी कार्यमुक्त करण्यात येणार आहे. बदली झालेल्या संवर्ग एकमध्ये २३१, संवर्ग दोन १०३, बदली अधिकार पात्र ८११ बदलीपात्र, अवघडक्षेत्र २८, विस्थापित १३७ अशा १३१० शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. सहाव्या टप्प्यातील एका शिक्षकाने बदली विरोधात स्थगिती आणली आहे. त्यामुळे न्यायालयीन प्रकरणातील शिक्षकांना कार्यमुक्त करू नये, असे स्पष्ट आदेश केलेले आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.