आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा परिषदेंतर्गत आरोग्य विभागाच्या आश्वसित प्रगती योजनेच्या लाभाची अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला विषय मार्गी लागला आहे. मंगळवारी आरोग्य सेविका संवर्गाच्या पात्र ४० कर्मचारी आरोग्य सेवक संवर्गाच्या ९६ तर औषध निर्माण अधिकारी संवर्गाच्या ६ कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावावर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी मंगळवारी स्वाक्षरी केली. गेल्या काही वर्षांपासून आरोग्य विभागाच्या कालबद्ध पदोन्नतीचा विषय प्रलंबित होता. याबाबत डॉ. आशिया यांनी सूचना देऊन हा विषय मार्गी लावण्याचे निर्देश दिले होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने पाठपुरावा करीत हा विषय मार्गी लावला. त्यामुळे पुढील टप्प्यात १४२ कर्मचाऱ्यांना आश्वसित प्रगती योजनेचा लाभ मिळेल.
अनास्था शालेय व्यवस्थापन समित्यांकडून चालढकलीचे प्रकार
जिल्ह्यातील १ लाख ५४ हजार ७४४ विद्यार्थाना ९ कोटी २८ लाखाचा निधी शालेय गणवेशासाठी देण्यात आला आहे. हा निधी शालेय व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापक यांच्या संयुक्त खात्यावर जमा होतो. समितीला यासंबधीचे अधिकार देण्यात आले आहे; मात्र शाळा सुरू होऊनही अद्याप बहुतांश शाळांमधील विद्यार्थी गणवेशापासून वंचित असल्याचे चित्र आहे. कोरोना संसर्गजन्य स्थितीमुळे गेल्या वर्षी पहिली ते आठवीतील शालेय विद्यार्थांना एकच गणवेश मिळाला, तोही उशिराने. यंदा शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश देण्याचे नियोजन राज्य शिक्षण मंडळाने केले आहे; मात्र शाळांमधील व्यवस्थापन समित्या मार्फत चालढकल होत असल्याने विद्यार्थी अजूनही गणवेशाविना आहेत. राज्य शिक्षण विभागाकडून निधी प्राप्त होताच, त्याचे शालेय समितीकडे त्याचे वितरण करण्यात आला असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. दरम्यान, शिक्षण विभागाकडून निधी उशीराने प्राप्त झाल्यामुळे गणवेशाचे नियोजन उशीराने करावे लागत असल्याचेही समिती सदस्यांनी सांगितले. मुख्याध्यापकांना यासंबधीच्या सूचना दिल्या असल्याचेही शिक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
निवडक शाळांमध्येच गणवेश विद्यार्थांच्या हाती पडणार जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील एससी, एसटी व बीपीएलमधील पहिली ते आठवीतील मुला-मुलींना केंद्र व राज्य सरकारच्या मदतीतून दरवर्षी दोन गणवेश मोफत दिले जातात. प्रत्येक गणवेशासाठी तीनशे रुपयांप्रमाणे प्रत्येक मुलाच्या गणवेशाला सहाशे रुपये देण्यात आले आहे. शालेय गणवेशाचा रंग ठरविण्याचा अधिकार शालेय समितीस आहे. गणवेशाचा दर्जा चांगला असावा, गणवेश उसवला किंवा फाटल्यास त्या शाळेतील शाळा व्यवस्थापन समिती जबाबदार धरण्यात यावे. विद्यार्थी संख्येनुसार गणवेशाचे कापड घेऊन टेलरची निवड करून ते शाळा सुरु होण्या आधी शिवून घेण्याची जबाबदारी समितीची आहे; मात्र अजूनही निवडक शाळांमध्येच गणवेश विद्यार्थांच्या हाती पडले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.