आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आध्यात्मिक सोहळा:पालखीचे यंदा 149 वे वर्षे; पादुकापूजनाने संचारले चैतन्य, रांगोळ्यांनी वेधले लक्ष‎

जळगाव‎18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव‎ शहराचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थान ‎ ‎ रामपेठ संचलित संत मुक्ताबाई राम ‎पालखीने मंगळवारी सकाळी ८ वाजता ‎पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले. ‎ ‎ कोरोनाच्या दोन वर्षांच्या खंडाने‎ प्रथमच ही पायी दिंडी निघाल्याने ‎ ‎ वारकऱ्यांत उत्साहाचे वातावरण होते. ‎दिंडीच्या रस्त्यात पालखीच्या‎ दर्शनासाठी लहान-थोरांनी मोठी गर्दी‎ केली होती.‎ श्री संत मुक्ताई रामपालखीचे हे‎ १४९वे वर्षे आहे. १० जुलै रोजी आषाढी ‎एकादशी असल्याने मंगळवारी ‎ जळगावहून पंढरपूरसाठी श्री संत ‎ ‎ मुक्ताबाई राम पालखी मार्गस्थ झाली.‎ श्री संत मुक्ताबाई पालखी सोमवारी‎ श्रीराम मंदिरातून विठ्ठल मंदिर, तरुण कुढापा चौक व जोशीपेठमार्गे अप्पा ‎ महाराज समाधी मंदिरात रात्रभर ‎मुक्कामाला होती. दुसऱ्या दिवशी ‎मंगळवारी सकाळी मंगेश महाराज‎ जोशी, श्रीराम महाराज जोशी‎ यांच्याहस्ते पूजन करण्यात आले.‎ आमदार सुरेश भोळे, महापौर जयश्री ‎महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील ‎उपस्थित होते. मंगळवारी सकाळी ८ वाजता श्री संत मुक्ताई रामपालखीचे‎ श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान झाले. ‎ ‎

जळगावातील श्रीराम मंदिर संस्थान रामपेठ‎ संचलित संत मुक्ताबाई राम पालखीचे मंगळवारी‎ पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले. त्यात सहभागी‎ झालेल्या वारकऱ्यांनी फुगड्या खेळल्या.‎डोक्यावर तुळशी, मुखी हरिनामाचा गजर‎ वारीत डोक्यावर तुळशी अन् मुखी हरिनामाचे गुणगाण करणाऱ्या‎ महिला वारकऱ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. वारकरी महिलांनी‎ फुगड्या खेळत सहभाग नोंदवला. दरम्यान, रस्त्यावर शहरातील‎ विविध भागातील व परिसरातील गावकऱ्यांनी संत मुक्ताईच्या‎ दर्शनासाठी सकाळपासून गर्दी केली होती. वारीत जळगावसह‎ वावडदा, शिरसोली, म्हसावद, आसोदा, चिंचोली आदी गावांतील‎ महिला व पुरुष वारकरी सहभागी झाले.‎

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे रांगोळ्या टाकून केले स्वागत‎ शिवरायांचा धारकरी तर पांडुरंगाचा वारकरी संगमाचे आयोजन पांडे चौकात श्री संत‎ मुक्ताबाई रामपालखी निमित्ताने करण्यात आले. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे पांडे‎ चौकाचा परिसर भगवे ध्वज, रांगोळ्यांनी सजवला होता. गादीपती मंगेश महाराजांनी‎ छत्रपती शिवाजी महाराज व संभाजीराजे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. आकाश फडे‎ यांनी मंगेश महाराजांना शिवचरित्र भेट दिले. पालखीतील श्रीराम व मुक्ताई पादुकांचे पूजन‎ शरद पवार, कपिल ठाकूर, रजत वाणी, विशाल जगदाळे, दीपक दाभाडे यांनी केले.‎

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे रांगाेळ्या टाकून केले स्वागत‎ शिवरायांचा धारकरी तर पांडुरंगाचा वारकरी संगमाचे आयोजन पांडे चौकात श्री संत‎ मुक्ताबाई रामपालखी निमित्ताने करण्यात आले. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे पांडे‎ चौकाचा परिसर भगवे ध्वज, रांगोळ्यांनी सजवला होता. गादीपती मंगेश महाराजांनी‎ छत्रपती शिवाजी महाराज व संभाजीराजे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. आकाश फडे‎ यांनी मंगेश महाराजांना शिवचरित्र भेट दिले. पालखीतील श्रीराम व मुक्ताई पादुकांचे पूजन‎ शरद पवार, कपिल ठाकूर, रजत वाणी, विशाल जगदाळे, दीपक दाभाडे यांनी केले.‎

जळगावातील श्रीराम मंदिर संस्थान रामपेठ‎ संचलित संत मुक्ताबाई राम पालखीचे मंगळवारी‎ पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले. त्यात सहभागी‎ झालेल्या वारकऱ्यांनी फुगड्या खेळल्या.‎ डोक्यावर तुळशी, मुखी हरिनामाचा गजर‎ वारीत डोक्यावर तुळशी अन् मुखी हरिनामाचे गुणगाण करणाऱ्या‎ महिला वारकऱ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. वारकरी महिलांनी‎ फुगड्या खेळत सहभाग नोंदवला. दरम्यान, रस्त्यावर शहरातील‎ विविध भागातील व परिसरातील गावकऱ्यांनी संत मुक्ताईच्या‎ दर्शनासाठी सकाळपासून गर्दी केली होती. वारीत जळगावसह‎ वावडदा, शिरसोली, म्हसावद, आसोदा, चिंचोली आदी गावांतील‎ महिला व पुरुष वारकरी सहभागी झाले.‎

बातम्या आणखी आहेत...