आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपचार:आरटीओ कार्यालयाजवळ 15 कोटींचे वन भवन ; वन्यप्राण्यांवर उपचार करण्यासाठी लांडोरखोरीत ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळ असलेल्या उपवनसंरक्षक यावल यांच्या शासकीय निवासस्थानाजवळ १५ कोटी रुपयांचे वन भवन या सुसज्ज प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवण्यात आलेला आहे. उपवनसंरक्षक जळगाव-यावल, सामाजिक वनीकरण विभाग व आरएफओ ही कार्यालयांचे प्रशासकीय वन भवन असणार आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळ उपवनसंरक्षक यावल यांचे शासकीय निवासस्थान आहे. शासकीय निवासस्थानातच त्यांचे कार्यालय आहे. सामाजिक वनीकरण विभागाचे कार्यालय भाडेतत्त्वावरील इमारतीत आहे. आरएफओ कार्यालयाला इमारत नाही. जिल्हाधिकारी कार्यालयामागील उपवनसंरक्षक जळगाव यांच्या कार्यालयामध्ये स्टोअर रूम नाही. स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था नाही. तसेच कार्यालयीन कामकाजासाठी पुरेसी जागा नाही. या कारणास्तव चारही कार्यालयांसाठी वन भवन ही प्रशासकीय इमारत बांधण्याचा १० कोटी रुपयांचा प्रस्ताव उपवनसंरक्षक विवेक होशिंग यांनी राज्य शासनाला पाठवलेला आहे. तेथे चार कार्यालयांसह स्टोअर रूम, मीटिंग हॉल होणार आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर उपवनसंरक्षक यावल यांचे कार्यालय विश्रामगृहात रूपांतरित करण्यात येणार आहे. त्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...