आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत तापलेले राजकारण शहराच्या विकासाच्या मुळावर उठले आहे. विभागीय आयुक्तांकडे मंजुरीसाठी सादर प्रस्ताव बैठकीत मंजूर केल्यानंतर अवघ्या बारा तासांत रद्द करण्यात आले. चाैथ्यांदा त्रुटी काढत १८ पैकी १५ काेटींच्या कामांचा परिपूर्ण प्रस्ताव मागवण्यात आला आहे. विशेष म्हणजे मंजुरी दिलेल्या २ काेटी ८० लाखांची कामे ही शिंदे गटातील नगरसेवकाच्या प्रभागातील असल्याने त्यांचा मार्ग माेकळा झाला आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीचे वातावरण तापले हाेते. भाजप व शिंदे गटाच्या विराेधात शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाचे पॅनल आमनेसामने हाेते. या निवडणुकीत एकमेकांवर आराेपांच्या फैरी सुरू असताना दुसरीकडे जळगाव शहरातील विकास कामांना ब्रेक लावण्याचे काम सुरू असल्याची टिका सुरू झाली आहे. महापालिकेने १० काेटीतून पाच कामे, पाच काेटीतून दाेन कामे तर २ काेटी ८० लाखाच्या निधीतून कामांना मंजुरीसाठी प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर केला हाेता. त्यावर ५ डिसेंबर राेजी नाशिक विभागीय आयुक्तांकडे बैठक पार पडली. त्यात आयुक्तांनी सर्व कामांना मंजुरी देत असल्याचे ताेंडी सांगीतले. त्यामुळे शहरातील प्रलंबित कामांना गती मिळेल अशी अपेक्षा हाेती. परंतु, प्रत्यक्षात इतिवृत्तात २ काेटी ८० लाखांच्या कामांना मंजुरी देताना उर्वरीत १५ काेटींच्या कामात त्रुटी काढण्यात आली आहे. यापूर्वी तीन वेळा त्रुटींची पुर्तता करण्यात आल्याचे पालिकेच्या सुत्रांचे म्हणणे आहे. आता चाैथ्यांदा त्रुटी काढण्यात आली.
प्रभाग क्रमांक अकरा अन् पाचची कामे मंजूर विभागीय आयुक्तांकडे तीन प्रस्ताव पाठवले हाेते. त्यापैकी एका प्रस्तावात शिंदे गटातील नगरसेवक ललित काेल्हे यांच्या प्रभागातील तीन कामांचा तर शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांच्या प्रभागातील एका कामाचा समावेश आहे.
असे राजकारण अयाेग्य विभागीय आयुक्तांकडे शहरातील विकास कामांचे प्रस्ताव वारंवार पाठवले जात आहेत. आता चाैथ्यांदा त्रुटी काढण्यात आली. एकदाच अडचणी सांगितल्या पाहिजे. ही कामे आमच्या प्रभागातील नाहीत. दूध संघाच्या निवडणुकीचा राग काढण्याची ही पद्धत अजिबात याेग्य वाटत नाही. - जयश्री महाजन, महापाैर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.