आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्स्पर्ट ओपिनियन:लेखनाची गती कमी झाल्याने विद्यार्थ्यांच्या गुणात 15 % घट ; शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी नोंदवले निरीक्षण

जळगाव23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारावीच्या परीक्षेत यंदा निकालाचा टक्का जरी वाढला असला तरी विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये मात्र घसरण झाली आहे. उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे. मात्र ‘अ’ श्रेणी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. कोरोनामुळे दोन वर्ष विद्यार्थी घरीच होते. ऑनलाइन शिक्षण सुरु असले तरी विद्यार्थ्यांचे लिखाण बंद होते. परिणामी यंदा परीक्षेत विद्यार्थ्यांना लिहिताना अडचण निर्माण झाली. लेखनाचा स्पीड कमी झाल्याने विद्यार्थ्यांना वेळेत पेपर पूर्ण करता आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणांत १५ टक्क्यांपर्यंतची घसरण झाली आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना वाढीव ३० मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. मात्र, विद्यार्थ्यांना स्पीड कव्हर करता आला नाही. यंदाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांचे अक्षर देखील खराब झाल्याचे दिसून आले. दरम्यान विद्यार्थ्यांनी दहावी व बारावीच्या गुणांची तुलना न करता सकारात्मक विचार करावा.

कला, वाणिज्यच्या नवीन वाटा निवडा ^कोरोनामुळे विद्यार्थ्यांची शिक्षणाची घडी विस्कळीत झाली. यंदा परीक्षा घेऊन बोर्डाने विद्यार्थ्यांना प्रवाहात आणण्याचे काम केले आहे. कमी गुण मिळाले तरी चालेल मात्र विद्यार्थ्यांनी प्रवाहात राहणे गरजेचे आहे. निकाल चांगला असून विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टीने त्याकडे बघावे. आपल्या क्षमतांचा विचार करून व गुणांचे मूल्यमापन करून विद्यार्थ्यांनी करिअरच्या वाटा निवडाव्या. पारंपारिक अभ्यासक्रमासह कला व वाणिज्य शाखेतील नवीन अभ्यासक्रमाच्या वाटांकडे वळावे. - प्रा. प्रसाद देसाई, स्वामी विवेकानंद महाविद्यालय

बी.व्होकसह शेअर मार्केटमध्ये करिअर ^जिथे कमी पडलो त्याचा विचार न करता ज्यात आपण पुढे गेलो आहे. त्यातच करिअर करण्याचा विचार करा. जे आपल्याला आवडते त्यात करिअर करणे सोपे जाते. यंदा गुण कमी असले तरी विद्यार्थ्यांसाठी नवीन वाटा खुप आहे. मॅनेजमेंट आणि कॉमर्स या दोघांमधील फरक ओळखून विद्यार्थ्यांनी करिअर निवडावे. शेअर मार्केटसह बी.व्होक कोर्सला प्रचंड स्कोप असून विद्यार्थ्यांनी त्याकडे वळायला हवे. करिअरच्या नवीन वाटा खुणावत आहेत. - प्रा. समीर नारखेडे, मॅनेजमेंट विभागप्रमुख, उमवि

परिसर मुलाखतींमधून नोकरीच्या संधी ^विद्यार्थ्यांनी बहुविद्याशाखीय अभ्यासक्रमांकडे वळले पाहिजे. आजकाल विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रचंड संधी आहेत. त्याचे सोने करता आले पाहिजे. आल्याला ज्याची आवड आहे अशा गोष्टींकडे करिअर म्हणून बघायला हवे. अभियांत्रिकी क्षेत्रात अनेक संधी असून प्रोजेक्टच्या माध्यमातून आपण स्किल दाखवू शकतो. आता परिसर मुलाखतीमधून लगेच नोकरीच्या संधी मिळत असल्याने ज्यात करिअर करायचे आहे तेच क्षेत्र निवडण्यावर भर द्या. - प्रा. डॉ. जी. एम. मालवतकर, प्राचार्य, शासकीय अभियांत्रिकी

बातम्या आणखी आहेत...