आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाणादाण:अर्ध्या तासातच १५ मि.मी. पाऊस; वादळामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमाेरील झाड काेसळले

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात रविवारी दुपारी दाेन वाजता दमदार पाऊस झाला. विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह झालेल्या या पावासने नागरिकांची धावपळ उडाली. अवघ्या अर्ध्या तासामध्ये पावसाने नवीपेठेसारख्या सखल भागात पाणी साचले. पिंप्राळासह परिसरात अवघ्या अर्धा तासात १५ मिमी पाऊस झाला.रविवारी दुपारी २ वाजता पावसाने शहरात वादळी हजेरी लावली. वादळी पावसाने झाडांच्या फांद्या तुटून पडणे, जीर्ण झाडे पडण्याच्या घटना घडल्या. जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भिंतीला लागून असलेल्या उपवनसंरक्षकांच्या बंगल्यातील एक झाड रस्त्यावर काेसळले. या झाडाच्या तीन माेठ्या फांद्या रस्त्यावर काेसळल्याने वाहतूक ठप्प झाली हाेती.

दिवसभराच्या पावसाने वीज गुल
शहरात रविवारी झालेल्या पावसाने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला; मात्र या पावसामुळे अनेक भागात वीज गुल झाल्याची घटना घडली. तर आकाशवाणी चौकात झाडाची फांदी पडून एका बाजूची रहदारी ब्लाॅक झाल्याने गैरसाेय झाली. रविवारी सकाळपासूनच उकाड्यात वाढ झाली होती. तर दुपारी एक वाजेदरम्यान जोरदार पावसाला सुरुवात झाली. नेहमीप्रमाणे पाऊस सुरू झाल्याबरोबर शहरात अनेक भागात वीज गुल झाली. दिवसभर विजेचीही जा-ये सुरू होती.दिवसभर विजेचा हा लपंडाव सुरू होता. दुपारी १ वाजता जोरदार पावसामुळे अनेक भागात वीज गुल झाली. यात नवीपेठ, शनिपेठ, बळीरामपेठ, आकाशवाणी चौक, इच्छादेवी चौक, हरिओमनगर, कांचननगर, मोहन टॉकीज, जैनाबाद, आसोदा रोड व शहरातील उपनगरांचा समावेश हाेता.

नवीपेठेत साचले पाणी : स्टेडियमपासून रस्त्याचे पाणी थेट शिवतीर्थ मैदानावर वाहत जाते. या मैदानाचे पाणी पुन्हा रस्त्याने पुढे गाेलाणी मार्केटकडे वाहत येते. मुख्य रस्त्याने अरुंद आणि बुजलेल्या गटारी असल्याने हे पाणी थेट रस्त्याने नवीपेठेतील सखल, खाेल गल्लीमध्ये येऊन तुंबून राहते. नवीपेठेतील गाेलाणी मार्केटला समांतर असलेल्या चार गल्लीमध्ये रविवारी दुपारी पाणी साचलेले हाेते. काेर्ट चाैक ते चित्रा चाैकादरम्यान रस्त्यावर ठिकठिकाणी तळे साचलेले हाेते.

बातम्या आणखी आहेत...