आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहराचे तापमान ४४ अंशांच्या पुढे गेले अाहेे. परिणामी उष्माघाताचा धोका वाढला आहे. सध्या जळगाव शहरात चक्कर, डोकेदुखी, मळमळ-उलटी, पोटात वेदना, गोंधळलेली अवस्था ही सामान्य सुरुवातीची लक्षणे रुग्णांत पाहायला मिळताहेत.
दररोज ओपीडीत सुमारे १० ते १५ टक्के रुग्ण हे उष्माघाताचे येत आहेत. यातही दाेन ते तीन टक्के रुग्णांना झटके येताहेत. याकडे दुर्लक्ष केल्यास जीव गमावण्याच्या धोका आहे. मात्र, असा रुग्ण जर समोर दिसला तर लगेच त्याचे अंग पुसून त्याला थंड हवेत न्यावे व तत्काळ डॉक्टरांकडे हलवावे, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला .
तीव्र उन्हाने शरीरातील तापमान नियंत्रित करणारी हायपोथॅलॅमसची यंत्रणा कोलमडून पडते आणि उष्माघात होतो. जीएमसीत ३० ते ४० टक्के तर खासगी रुग्णालयात १० ते १५ टक्के रुग्ण हे उष्माघाताची लक्षणे असल्याचे समाेर येते अाहे.
उष्माघाताची लक्षणे
उच्च ताप, कमी रक्तदाब, चक्कर येणे, उलट्या होणे, स्नायूंमध्ये कडकपणा, सतत घाम येणे, अशक्तपणा, त्वचेवर पुरळ, बेशुद्ध होणे, डोकेदुखी, श्वास घेण्यास समस्या, भीती आणि अस्वस्थता.
उष्माघाताची प्राथमिक लक्षणेे रुग्णांत दिसताहेत. सध्या मेंदूच्या आजाराचे रुग्ण वाढले असून, वाढत्या उन्हामुळे दाेन टक्के मेंदू अाजाराचे रुग्ण दिसून येत आहेत. वेळीच उपचार करणे आवश्यक आहे.
- डॉ. निखिल पाटील, फिजिशियन, जळगाव
उष्माघात आणि ताप येणे या भिन्न प्रक्रिया आहेत. ताप येण्यामध्ये शरीराचे तापमान नेहमीहून अधिक राहते. उष्माघात म्हणजे शरीराचे तापमान ३८.१पेक्षा अधिक किंवा त्याहून अधिक तापमानाला स्थिर राहणे. दुपारी शरीराचे तापमान ३७.७० सेल्सिअस असते. उष्माघातात हे तापमान ४० सेल्सिअस होऊन जीवघेणे ठरते हे लक्षात ठेवावे.
यांना आहे उष्माघाताचा धोका
जास्त तापमानामुळे शरीरातील महत्त्वाचे अवयव निकामी होतात. उष्माघात हा प्रामुख्याने नवजात शिशू, लहान मुलं, वयोवृद्ध, पाणी कमी पिणारे लोक, दीर्घ आजारी व मद्यप्राशन करणाऱ्यांत आढळतो. हृदयरोग, फुप्फुसांचे आजार, मूत्रपिंडाचे आजार, लठ्ठपणा उच्च रक्तदाब, मधुमेहींना उष्माघाताचा त्रास अधिक हाेताे.
असा करा उष्माघातापासून बचाव
उन्हात बाहेर निघू नका , छत्री वापरा, चहा- कॉफी किंवा गरम पदार्थ टाळा, दिवसातून तीन लिटर पाणी प्या, दीर्घकालीन काम टाळा, उष्माघात झाल्यास डॉक्टरांना भेटा, साखर असलेले पेय पिणे टाळा, सैल कपडे घाला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.