आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागून असलेल्या जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी सहकारी पतपेढीच्या निवडणुकीत सहकार पॅनलने दणदणीत विजय मिळवला. त्यांचे १५ उमेदवार विजयी झाले, तर विरोधातील परिवर्तन पॅनलला भोपळाही फोडता आला नाही. दुसरीकडे ६ अपक्षांनी विजयश्री खेचून आणली. या पतपेढीच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले होते. त्यात १०,१८० पैकी ८,७१८ मतदारांनी मतदान केले होते. एकूण ८५.६४ टक्के मतदान झाले होते. यानंतर सोमवारी लेवा भवनात मतमोजणी झाली. या निवडणुकीत सहकार पॅनलचे विद्यमान अध्यक्ष एस.डी.भिरुड, जगदीश पाटील, सिद्धेश्वर वाघुळदे हे तालुका मतदारसंघातून, तर महिला राखीवमधून वैशाली महाजन, सोनम पाटील असे ५ उमेदवार पूर्वीच बिनविरोध निवडून आले होते.
सोमवारच्या मतमोजणीत सहकार पॅनलचे जळगाव ग्रामीण मतदारसंघातून डिगंबर पाटील, भुसावळ तालुका हेमंत चौधरी, बोदवड तालुका संजय निकम, पाचोरा तालुका भावेश अहिरराव, चाळीसगाव तालुका रवींद्र रणदिवे, एरंडोल तालुका भगतसिंग पाटील, जामनेर तालुका आबा पाटील, एस्सी संवर्गातून जानकीराम सपकाळे, ओबीसी संवर्गातून अजयकुमार पाटील, एनटी संवर्गातून संदीप घुगे हे १० उमेदवार निवडून आले. याशिवाय मतदारांनी ६ अपक्षांना विजयी कौल दिला. परिवर्तन पॅनलला भोपळा मिळाला.
अमळनेरात बोरसे तर पारोळ्यात पाटील
अमळनेरात तुषार बोरसे (५२९ मते) यांनी मधुकर आनंदा पाटील (२४३), पारोळ्यात सचिन विठ्ठल पाटील (२३२) यांनी नंदकुमार पाटील (२०७), रावेरात शैलेश रमेश राणे यांनी दुसऱ्यांदा अपक्ष विजय मिळवला. त्यांना ५१५, तर प्रतिस्पर्धी नितीन महाजन यांना २२७ मते मिळाली. चोपड्यात संजय साेनवणे (३००) यांनी ज्ञानेश्वर पाटील (२२६) यांना पराभूत करत विजयश्री खेचून आणली.
पॅनलमध्ये नाही, तरी अपक्ष विजय
धरणगाव तालुका मतदार संघातून रवींद्र बाबूराव चव्हाण यांना सहकार पॅनलमध्ये जागा मिळाली नव्हती. त्यामुळे त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढवली. या निवडणुकीत ते १२० मतांनी विजयी झाले. त्यांना ४२८ पैकी २५५ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी डी.एस.पाटील यांना केवळ १३६ मते मिळाली. अपक्ष म्हणून चव्हाण यांना विजय मिळाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.