आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणीत घट:150 क्विंटल भाजीपाला दिला गाेशाळेत

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिवाळ्यात सर्वच भाज्यांची आवक वाढते. त्यात बाजार समितीत शनिवारच्या दिवशी ती अधिक हाेती. शनिवारी दुपटीने भाजीपाल्याची आवक झाल्याने भाव तर पडलेच, त्यासाेबत उठाव न मिळाल्याने शेतकऱ्यांनी साेडून दिलेला सुमारे सव्वाशे ते दीडशे क्विंटल भाजीपाला गाेशाळेत पाठवला.बाजारपेठेत भाजीपाल्याच्या तुलनेत शनिवारी दुपटीपेक्षा जास्त आवक झाली. सर्वच भाज्यांचे दर घसरले. त्यात फ्लाॅवर, पत्ता काेबी, मेथी, भाजीचे वांगे, टाेमॅटाे,भरिताचे वांगे यांचे दर ३ रुपये ते ८ रुपये किलाे एवढे खाली आले हाेते.

भाजीपाला पडून सडून फेकला जाऊ नये म्हणून बाजार समितीतर्फे गाेशाळा व्यवस्थापनाला फाेन करून सव्वाशे ते दीडशे क्विंटल भाजीपाला देण्यात आल्याचे लिलाव समन्वयक वासुदेव पाटील यांनी सांगितले. असा हाेता बाजार समितीत भाज्यांचा प्रती किलाेचा दर कंसात झालेली आवक फ्लाॅवर ३ ते ७ (४५ क्विंटल), पत्ता काेबी ४ ते ८ (३३), मेथी ५ ते ७ (११), वांगे ४ ते ८ (६२), भरिताचे वांगे ८ ते १२ (८०), टाेमॅटाे ५ ते १० (८३),काेथिंबीर १० ते २० (१४),मिरची १५ ते २० रुपये (५०), बारीक मिरची १५ ते २५ (५५).

बातम्या आणखी आहेत...