आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेशप्रक्रिया:आयटीआयच्या 912 जागांसाठी 1500 अर्ज ; जागा वाढवण्याची मागणी

जळगाव17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या आयटीआय व डिप्लोमा या दोन्ही अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सुरू असून, विद्यार्थ्यांचा डिप्लोमाच्या तुलनेत आयटीआयकडे अधिक कल दिसून येत आहे. डिप्लोमाच्या ३९५७ जागांसाठी ४१४१ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहे. तर दुसरीकडे आयटीआयच्या ९१२ जागांसाठी दीड हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहे. अजून चौथ्या फेरीचे अर्ज बाकी असून ही संख्या तीन हजारांवर पोहोचण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. प्रवेश क्षमतेच्या तिपटीने आयटीआयसाठी अर्ज येत असल्याने जागा वाढवण्याची मागणी विद्यार्थ्यांमधून केली जात आहे. जळगाव शहरात आयटीआयच्या ९१२ जागांसाठी १४४८ विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चित केले आहेत. पहिल्या फेरीसाठी पात्र विद्यार्थ्यांना ३ ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहे. दरम्यान, कमी कालावधी व अल्प खर्चात रोजगारासह स्वयंरोजगाराच्या संधी असल्याने शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थी आयटीआयला प्राधान्य देतात. तर दुसरीकडे दहावीनंतर विद्यार्थ्यांना अकरावीबरोबरच तंत्रशिक्षणाची संधी उपलब्ध असून, पाॅलिटेक्निक डिप्लोमासाठी विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात.पाॅलिटेक्निकसाठी प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्यानंतर प्रथम ३० जूनपर्यंत अर्जासाठी मुदत होती. त्यानंतर सलग पाच वेळा मुदतवाढ दिली तरी विद्यार्थी मिळत नसल्याने शिक्षक चिंतेत आहेत. त्यामुळे जागा भरण्यास पुरेसे विद्यार्थी नसल्याची स्थिती आहे.

सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना संधी : यंदा सीबीएसई दहावी व बारावीचा निकाल उशिरा लागल्याने विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया बाकी आहे. तर दुसरीकडे अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे अनेक विद्यार्थी प्रवेश अर्ज करू शकले नाही. त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी डिप्लोमा प्रवेश अर्जासाठी पाचव्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे.

डिप्लोमा : अर्जासाठी उद्या शेवटची मुदत
२ जून ते ४ ऑगस्ट ऑनलाइन अर्ज नोंदणीची मुदत
६ ऑगस्ट तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध
६ ते ८ ऑगस्ट आक्षेप नोंदवण्यासाठी मुदत
९ ऑगस्ट अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध

बातम्या आणखी आहेत...