आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी:विदर्भ, महाराष्ट्रसह 16 रेल्वे गाड्या 5 व 6 डिसेंबर रोजी रद्द, काही गाड्यांच्या मार्गात बदल

जळगाव8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव ते भुसावळ दरम्यान तिसऱ्या व चौथ्या लाइनच्या कामासाठी जळगाव स्थानकात यार्ड रिमोल्डिंगच्या कामासाठी 5 व 6 डिसेंबर रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगा ब्लॉक दरम्यान हावडा ते मुंबई मार्गावरील विदर्भ एक्सप्रेस व महाराष्ट्र एक्सप्रेस अप व डाऊन अशा 38 गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पैकी 16 गाड्या जळगाव स्थानकातून जाणाऱ्या असल्याने जळगावकरांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनातर्फे दर महिन्याला घेण्यात येणाऱ्या या ब्लॉकमुळे प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जळगाव ते भुसावळ येथून मध्यप्रदेशातील प्रमुख शहरे ते उत्तर भारत तसेच राज्याची राजधानी मुंबई, दक्षिण मध्य विभागातील मराठवाडा आणि हैदराबाद येथे जाण्यासाठी सोय आहे. परंतु येथून प्रवाशांना जाण्यात मेगा ब्लाॅकमुळे अडचणी येणार आहेत.

रेल्वेकडून होणाऱ्या मेगाब्लाॅकमुळे प्रवाशांची मोठी तारांबळ होत आहे. रेल्वेला जनवाहिनी म्हणून ओळख आहे. परंतु मेगाब्लाॅक आणि रिमोल्डींगच्या कामामुळे प्रवाशांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागत आहे.

या गाड्यांच्या मार्गात बदल

  • मेगा ब्लॉकमुळे अहमदाबाद-हावडा एक्सप्रेस, अहमदाबाद-भरूच, ओखा-रामेश्वरम एक्सप्रेसह, सचखंड एक्सप्रेस,
  • नवजीवन एक्सप्रेस, ताप्तीगंगा एक्सप्रेस, सुरत सुफरफास्ट एक्सप्रेस, यशवंतपूर एक्स्प्रेस,
  • ओखा-द्वारका एक्सप्रेस, मंगला एक्सप्रेस, यशवंतपूर-अहमदाबाद एक्सप्रेस,
  • रामेश्वर-ओखा एक्सप्रेस हे रेल्वे मार्ग वळवण्यात आले आहेत.

या गाड्या रद्द

  • नागपूर-पुणे एक्सप्रेस, भुसावळ-पुणे एक्सप्रेस, नागपूर-पुणे सुपरफास्ट,
  • सेवाग्राम एक्सप्रेस, भुसावळ-इगतपुरी मेमू, राजकोट-रेवा एक्सप्रेस,
  • भुसावळ-नंदुरबार एक्सप्रेस, अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेस, प्रेरणा एक्सप्रेस, भुसावळ-देवळाली एक्सप्रेस,
  • खान्देश एक्सप्रेस, महाराष्ट्र एक्सप्रेस, सुरत-भुसावळ एक्सप्रेस, सुरत-भुसावळ सुपरफास्ट एक्सप्रेस,
  • मडगाव-नागपूर एक्सप्रेस, पुणे-जबलपूर एक्सप्रेस, अमरावती-मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस, मुंबई-नागपूर विदर्भ एक्सप्रेस, भुसावळ-कटनी एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
बातम्या आणखी आहेत...