आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन वर्षाचा श्रीगणेशा होणार:नववर्षात 162 सर्वार्थसिद्धी योग, 143 रवी योग ; 33 अमृत सिद्धीयोग : ज्याेतिष अभ्यासक

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नवीन वर्ष २०२३चा शुभारंभ शिव, सिद्ध, सर्वार्थ सिद्धी रवी, बुधादित्य योग व अश्विनी नक्षत्र या पाच शुभ योगांसह सूर्यदेवतेशी संबंधित तीन संयोगही या वर्षभरात जुळून येत आहेत. यात पहिला योग सूर्य धनू राशीत बुधाबरोबर राहून बुधादित्य योग तयार होणार आहे. दुसरा अश्विनी २७ नक्षत्रातील पहिले नक्षत्र अश्विनी आहे. अश्विनीकुमार हे सूर्यपुत्र आहेत. तर तिसरा वर्षाचा पहिला दिवस रविवार आहे. त्यामुळे संपूर्ण वर्ष हे ऊर्जावान राहण्यास खऱ्या अर्थाने मदत मिळणार आहे.

तीन ग्रहणात भारतात केवळ एक दिसेल सन २०२३मध्ये तीन ग्रहण राहतील. यात २० एप्रिलला खग्रास सूर्यग्रहण, १४ ऑक्टोबरला कंकणाकृती सूर्यग्रहण तर २८-२९ दरम्यान खग्रास चंद्रग्रहण होईल. दोन्ही सूर्यग्रहण भारतात दिसून येणार नाहीत. तर २८-२९ ऑक्टोबरदरम्यान होणारे खंडग्रास चंद्रग्रहण मात्र दिसणार आहे.

वर्षातील पहिला दिवस खास सन २०२३ला एक विशेष संयोग बनत आहे. त्यात १ तारीख, नक्षत्रांच्या क्रमवारीत पहिले नक्षत्र अश्विनी, राशींच्या क्रमातील मेष रास व वारांचा क्रमातील पहिला वार रविवार हे सर्व २०२३ला पहिल्याच दिवशी जुळून आल्याने वर्षातील पहिला दिवस खास ठरणार आहे. त्यामुळे सूर्याच्या प्रभावाने जगात भारत तंत्रज्ञानात आपले प्रभुत्व प्रस्थापित करण्याचे संकेत सध्या दिसत आहेत. - नंदू शुक्ला, पुरोहित, जळगाव

बातम्या आणखी आहेत...