आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:छंदातून सेलिब्रिटींना लिहिली 17000 पत्रे; रमेश बारी यांचा उपक्रम

जळगाव6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोबाइल, व्हाॅट‌्सअॅपसह सोशल मीडियाच्या जमान्यात पत्रव्यवहार दुर्मीळ होत चाललेलं काम ज्ञानदेवनगरातील ७५ वर्षीय रमेश आनंदा बारी यांनी आपल्या छंदातून टिकवून ठेवलं आहे. त्यांनी आजवर देशातील नामवंत व्यक्तींसह जपान, अमेरिका, इंग्लंड मधील राष्ट्राध्यक्षांसह धर्मगुरू, सिने कलावंत सेलिब्रिटींना १७ हजारांपेक्षा अधिक पत्र लिहिली आहे. त्यांच्या पत्राची दखल घेत त्यांना अनेकांनी उत्तरे दिली आहे.

नववीपर्यंतचे शिक्षण घेतलेले रमेश बारी हे प्रिंटिंग प्रेसच्या व्यवसायात कार्यरत आहेत. सध्या वृद्धत्वामुळे त्यांचा परिवार हा व्यवसाय पाहत आहे; मात्र पत्रव्यवहाराच्या छंदापासून ते आजही वेगळे झालेले नाहीत. प्रासंगिक, वाढदिवस, अभिनंदन, शुभेच्छा, सांत्वन याविषयावर त्यांचे पत्रलेखन. विविध वर्तमानपत्रांमधून मान्यवरांचे कार्य जाणून घेत, मराठी, हिंदी प्रसंगी इंग्रजीमधून ते दिल्ली येथील राजकीय दूतावासामार्फत पत्राद्वारे आपल्या भावना सातासमुद्रापलीकडील संबंधितांपर्यंत पोहाेचवतात. विदेशातील पत्रांसाठी मराठीत लेखन करून इंग्रजी विषयक तज्ज्ञांकडून इंग्रजीत भाषांतर करून ते पत्र पाठवत आहे.

१० वेळा पत्रांचे भरवण्यात आले प्रदर्शन
पत्रलेखनाची कला विकसित व्हावी व ही संस्कृती टिकून राहावी या उद्देशासह आपण लिहिलेली पत्रे व देशविदेशातील सेलिब्रिटीजकडून आलेली पत्रे ही विद्यार्थी, वाचकांना पाहता यावी यासाठी १० वेळा पत्रांचे शहरासह विविध शाळा, महाविद्यालये, एक्झिबिशनमध्ये प्रदर्शन मांडले असल्याचेही बारी यांनी सांगितले.

तब्बल दाेन पेट्या पत्रांचा केला संग्रह
सेलिब्रिटींना लिहिलेली पत्र व त्यांना आलेल्या हजारो पत्रांचा संग्रह बारी यांनी केला आहे. आजवरच्या कालावधीत अनेक आकर्षक पत्रे गहाळ झाली. उर्वरित दोन पेट्यांचा संग्रह आहे. यातील आकर्षक पत्रे ही अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी दिली असून, यासह अनेक नामवंत व्यक्तींच्या स्वाक्षरींचे नमुनेही आपल्याकडे असल्याचे पत्रलेखन छंदकार बारी यांनी सांगितले.

यांना पाठवण्यात आली पत्रे
इंिदारा गांधी, सोनिया गांधी, पु.ल. देशपांडे, जगतगुरू शकंराचार्य कांचीपूरम पीठ, सुवर्ण मंदिर संस्थान अधिपती अमृतसर, दलाई लामा, मदर तेरेसा आश्रम काेलकाता, अभिनेता अमिताभ बच्चन, संजय दत्त, नसिरुद्धीन शाह, राज ब्बर, डॅनी डेंझोपा यांसह क्रिकेटपटू अजित वाडेकर, बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोन, आशा भोसले, मोहमंद रफी, व्ही. शांताराम, टी. रामाराव यांच्यासह शेकडो सेलिब्रिटींना पत्र पाठवली आहेत. पत्रांबरोबरच देश-विदेशातील भूकंप, अतिवृष्टी, आपत्कालीन स्थितीत यथाशक्ती आर्थिक मदतही पाठवण्यात त्यांचा पुढाकार आहे.

बातम्या आणखी आहेत...